Bala Rafiq Sheikh : महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) बाला शेखनं (Bala Rafiq Sheikh) कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली. त्याने सुरु सामन्यातून मैदान सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. चिपळूणमध्ये (Chiplun) सध्या कोकण केसरी स्पर्धेचा (Kokan Kesari 2023) थरार सुरु आहे. चिपळूण मध्ये रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2018) बाला रफिक शेख यानं सुरू कुस्तीच्या सामन्यात मैदान सोडलं. पंचांचा निर्णय न पटल्यामुळे नाराज झालेल्या बाला रफिक शेखने कुस्तीच्या आखाड्यातून घेतली.
बाला शेखची कुस्तीच्या आखाड्यातून माघार
चिपळूणमधील खेर्डी येथे कोकण केसरीच्या पहिल्या स्पर्धेच्या दरम्यान हा प्रकार घडला. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि महाराष्ट्र उपकेसरी प्रकाश बनकर यांच्यात लढत सुरू होती. यावेळी पंचाचा निर्णय न पटल्याने त्याने सुरु सामन्यातून माघार घेतली. दरम्यान, वरिष्ठांच्या मध्यस्ती नंतर बाला पुन्हा मैदानात उतरला. मात्र, कुस्तीचा निकाल न लागल्याने सामना बरोबरीत संपला.
बाला शेख महाराष्ट्र केसरी 2018 विजेता
बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेचा पराभव करून महाराष्ट्र केसरी 2018 चं विजेतेपद पटकावलं आहे. बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असताना तो कुटुंबाची कुस्तीचा परंपरा कायम ठेवून आहे. सुरुवातीला त्याच्यासाठी दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा आव्हानात्मक होते. अशा परिस्थितीतही त्यानं अडचणींवर मात करत कुस्ती शिकली. बालाने त्याच्या कुटुंबाती गेल्या पाच पिढ्या कुस्तीची परंपरा जोपासली आहे.
पाहा फोटो : महाराष्ट्र केसरी बाला शेखची सुरु असलेल्या सामन्यातून माघार, कोकण केसरी स्पर्धेतील प्रकार
कोकणात पहिल्यांदाच कोकण केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
कोकणात पहिल्यांदाच हिंदुदयसम्राट कोकण केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं. चिपळूण, खेर्डी विभाग शिवसेना, युवा सेना, आदर्श क्रीडा आणि सामाजिक प्रबोधिनी चिपळूण यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 7 मे रोजी खेर्डी आठवडा बाजार मैदानात या स्पर्धेता थरार पाहायला मिळाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळतो आणि ठिकठिकाणी या स्पर्धेचे नियोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर कोकण केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
कोकण केसरी कुस्ती स्पर्धेचा लाईव्ह थरार येथे पाहा :
महत्त्वाच्या इतर बातम्या :