मुंबई कुख्यात गँगस्टर आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim)  आईच्या नावे असलेल्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव होणार आहे. रत्नागिरी (Ratnagiri News)  जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुंबके इथे या चार मालमत्ता आहे. शेतजमिनीच्या रूपात असलेल्या चारही मालमत्ता दाऊदची आई अमिना बी यांच्या नावावर आहेत. त्यांचा लिलाव (Dawood Ibrahim Property Auction)  शुक्रवारी होतोय. गेल्या नऊ वर्षात दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांच्या जवळपास 11 मालमत्तांचा अधिकाऱ्यांनी लिलाव केला आहे.


रत्नागिरीतील मुंबके येथील डॉन दाऊद इब्राहिम याच्या  चार जागांचा लिलाव होणार आहे. यामध्ये चार शेत जमिनींचा समावेश आहे. जवळपास 20 गुठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. चार जमिनीपैकी एका जमिनीची किंमत 9 लाख 41 हजार 280 रुपये इतकी आहे. तर दुसऱ्या शेतजमिनीची अंदाजे किंमत ही 8 लाख 8 हजार 770 रुपये इतकी आहे. मुंबके येथील जमिनींच्या लिलावाबाबत 21 नोव्हेंबर 2023 रोजी लिलावाबाबत नोटीस काढण्यात आली होती.  दाऊद इब्राहिम कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.


 2020 साली देखील रत्नागिरीतील मालमत्तेचा केला होता लिलाव


भारतातल्या काळ्या कारवायांचं मूळ असलेल्या दाऊदबद्दल अनेक नाना तर्कवितर्क समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.  कधी त्याच्या वास्तव्याबद्दल तर कधी त्याच्या प्रकृतीबद्दल  अशा अनेकदा अफवा समोर आल्या आहेत. त्यानंतर दाऊद चर्चेत राहतो. तीन वर्षांपूर्वी देखील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला होता.  2020 साली 1.10 कोटीच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता.दोन फ्लॅट आणि बंद पडलेल्या पेट्रोलचा लिलाव करण्यात आला होता. 


दाऊद जगातील सर्वात श्रीमंत गँगस्टर


दाऊदचा इब्राहिम पाकिस्तानात राहून तिथून त्याच्या काळ्या कारवाया करतो. अनेद देशात कायदेशीर आणि बेकायदेशीरपणे त्याचे काळे धंदे सुरू आहेत. या काळ्या धंद्याच्या जोरावर दाऊद जगातील  सर्वात श्रीमंत गँगस्टर बनला आहे. फोर्ब्ज मासिकाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार 2015 साली दाऊदची संपत्ती जवळपास 6.7 बिलियन डॉलर आहे.  


2020 साली कोरोनामुळे कराचीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाऊदचा मृत्यू झाल्याची बातमी आली. 2017 सालीही हृदयविकाराच्या धक्क्यामुळे दाऊदचा मृत्य़ू झाल्याची अफवा होती. 2016 साली गँगरिनमुळे दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाल्याच्या चर्चा होती. 
एड्समुळेही दाऊदचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. दाऊदवर खरंच विषप्रयोग झाला का? दाऊद खरंच अत्यवस्थ आहे का? याची कुठलीही अधिकृत माहिती नाही.


हे ही वाचा :


अवघ्या 10 सेकंदात गेम, पाकिस्तानात आश्रय घेणारे 18 दहशतवादी मारले; आता नंबर दाऊदचा?