Chandrashekhar Bawankule : मी एकनाथ शिंदेंची भेट घ्यायला जाणार यात तथ्य नसल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतल्यावर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मार्ग काढू असेही बावनकुळे म्हणाले. एकनाथ शिंदेंची कुठलीही नाराजी नाही, काही चर्चा आवश्यक आहेत असेही बावनकुळे म्हणाले. 


मुख्यमंत्री आऊट ऑफ इंडिया आहेत. त्यामुळं निर्णय होऊ शकला नाही, मात्र ते आले की निर्णय यावर होईल असेही बावनकुळे म्हणाले. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले होते, तर नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. मात्र, या निर्णयामुळं शिवसेना शिंदे गट नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच भरत गोगावले यांच्या समर्थकांनी देखील राजीनामे दिले आहेत. दरम्यान, निर्णय होताना चर्चा झाली होती, काही ठिकाणी अनेक दावेदार आहेत असंही बावनकुळे म्हणाले. 99 टक्के मार्ग काढला आहे, 19-20 होत असतं असेही ते म्हणाले. 


आंदोलनात्मक पवित्रा कुणी घेऊ नये


आंदोलनात्मक पवित्रा कुणी घेऊ नये असेही ते म्हणाले. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, चर्चा म्हणजे दबाव नाही. चर्चा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. 25 तारखेला मुंबईत मोर्चा निघणार आहे. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, फडणवीस सरकार जेव्हा जेव्हा आलं तेव्हा महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न झाल्याचे बावनकुळे म्हणाले. 


रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नाही


रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच अदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली. त्यानंतर राज्य सरकारने शासन निर्णय जाहीर करत रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती दिली. त्यामुळे आता रायगड आणि नाशिक जिल्हाच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Raigad And Nashik Guardian Minister: नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय?