Raj Thackeray in Raigad : रायगड : महाराष्ट्रावर (Maharashtra) होणारे आक्रमणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ''पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहेच. तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे. याचा तुम्हाला अंदाज आहे का? बाकीच्या राज्यातील तिथले नेते अलर्ट असतात. ते त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात. अलिबागमधील काही गावे संपली आहेत, तिथल्या जमिनी गेल्या, तुमच्याकडे जमीन नसेल तर, तुम्ही कुठलेही नागरिक नाही. पैशाची गरज आहे, पण जमीन विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते. त्याचा मोबदला योग्य मिळतोय का, दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला विश्वास बसतो. तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला महागडी विकतो. हाताखालच्या जमिनी जात आहेत'', असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


''पैसे देऊन बलात्कार सुरु आहे''


महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना कळायला हवं. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत.


राज ठाकरे काय म्हणाले?


राज ठाकरे म्हणाले की, ''मला फक्त पत्रकारांशी संवाद करायचा होता. थेट जमीन परिषद नाव देवून जाहीर करायचं नव्हतं. बाकीचे लोक कसं हुशारीने घुसतात ते बघा, ही जाहिर सभा नाही. महाराष्ट्रावर होणाऱ्या आक्रमणावर मला बोलायचं होतं. पत्रकारांवर आजही लोकांचा विश्वास आहे. पेपरमध्ये आलंय, याचा अर्थ लोकांचा विश्वास बसतो. पत्रकारांवर मोठी जबाबदारी आहे.''


''तुम्ही रायगड जिल्ह्यात कोणती जबाबदारी पार पाडायची यावर मी बोलणार आहे. पुणे, नाशिक, ठाणे, मुंबईची वाट लागली आहे. तुमची पायाखालची जमीन निघून चालली आहे. याचा तुम्हाला अंदाज आहे का? बाकीच्या राज्यातील तिथले नेते अलर्ट असतात. ते त्यांच्या लोकांचा पहिला विचार करतात. अलिबागमधील काही गावे संपली आहेत. तिथल्या जमिनी गेल्या. तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही.''


''पैशाची गरज आहे, पण ती विकल्यावर ती कोणाच्या घशात जाते. त्याचा मोबदला योग्य मिळतोय का? दलाल बहुतांशी मराठी असल्याने आपला विश्वास बसतो. तुमच्याकडून स्वस्तात जमीन घेवून सरकारला महागडी विकतो. हाताखालच्या जमिनी जात आहेत. ट्रान्स हार्बर, रोरो, सी लिंक, मोठ्या सुविधासांठी जमिनी जात आहेत'', असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.


''आपण आपल्या जमिनी शांतपणे वाचवल्या पाहिजेत''


राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आपल्या जमिनी वाचवण्याचं आणि न विकण्याचं आवाहन करत म्हटलं की, ''आपल्या लोकांना भान राहिलेले नाही. माथेरान, नेरळ येथे बघा कोण घरे घेत आहेत. मराठी लोक संपत चालली आहेत. स्वत:च्या भाषेसाठी मनसे कार्यकर्त्यांनी सतर्क असलं पाहिजे. देशावर राज्य करणाऱ्या मराठा लोकांच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. त्यांना पोरकं केलं जात आहे. जमिन पोखरली जात आहे. दलालांनी आपल्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. पुण्यातील माणसं उध्वस्त झाली. आपण आपल्या जमिनी शांतपणे वाचवल्या पाहिजेत. कालांतराने माझे शब्द आठवतील. राज्यात जे चांगले आते घेतले जात आहे.''


''...मग कपाळावर हात मारत पश्चाताप करायची वेळ येईल''


'तालुक्यातील उद्योग तुमचे पाहिजेत. दुसरीकडे नोकऱ्या करू नका. पनवेलमधील भाषा बदलली? उद्या अलिबागची भाषा हिंदी बनेल. तुम्ही हिंदी बोलायला लागाल. ठाणे जिल्हा जगात एक नंबर आहे, जिथे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. ठाणे जिल्ह्यात 7 महानगर पालिका आहेत. येवढी लोकसंख्या वाढली आहे. सगळे हातातून गेल्यावर कपाळावर हात मारत पश्चाताप करायची वेळ येईल. माझा यामध्ये व्यावहार नाही. बाकीचे नेते व्यवहार करीत आहेत. मी तुम्हाला जाग करतोय. परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरी, पुढील चार-पाच वर्षात परिस्थिती हातून निघून जाईल. अनेक राज्यात जमिनी विकत घेण्यासाठी परवानगी दिली जात नाही.', हे मुद्दे राज ठाकरे यांनी या परिषदेत अधोरेखित केले आहेत.