रायगड:  रायगड जिल्ह्यातील (Raigad )  उरणमधून एक धक्कादायक बातमी आहे. उरण रेल्वे स्थानकातून घरी जात असताना शनिवारी रात्री साडे अकरा वाजता एका दाम्पत्याला क्रेटा कारनं धडक दिली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Uran Accident News) झाला, तर त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनचालक जय चंद्रहास घरत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी राज घरत हा फरार असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी जनवादी संघटनेनं केली आहे. आरोपी जय घरत हा भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते चंद्रहास घरत यांचा मुलगा आहे.  अपघात झाल्यावर तिथं हजर असलेल्या सीआरपीएफच्या जवानाला मारहाण करून पळ काढला, असा आरोप होतोय.


चार वर्षांची चिमुकली अपघातात जखमी  


 उरण रेल्वे स्थानकातून शनिवारी रात्री 11.30  वाजता दुचाकीवरून एक दाम्पत्य जात असताना त्यांना समोरून येणाऱ्या एका क्रेटा कार चालकाने   जोराची धडक दिली.  यामध्ये या अपघातात  एका विवाहित दाम्पत्याला आपले प्राण गमवावा लागले.   पवित्र बराल (40)  रश्मिता बराल (37) पती-पत्नीचा  जागीच मृत्यू झाला तर त्यांची चार वर्षांची चिमुकली या अपघातात जखमी असून या मुलीवर उरण येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत ती मृत्यूशी अद्याप झुंज देत आहे . या घटनेबाबत उरणच्या नागरिकांकडून हळहळ व्यक्त केला जात आहे. घटनेला जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी  जनवादी महिला  केली आहे. 


अपघातानंतर सीआरपीएफ जवानाला  मारहाण


चालक जय घरत हा उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते चंद्रहास घरत यांचा मुलगा आहे.  चालकाने या घटनाप्रसंगी दबावतंत्र वापरून तेथील अतुल चव्हाण या सीआरपीएफ जवानाला देखील मारहाण करुन तेथून पळ काढल्याची माहिती सामोरं येतं आहे. या संपुर्ण  प्रकारचे पडसाद आता उरण परीसरात उमटू लागल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. जनवादी  संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील  कामगार नेते  भूषण पाटील, यांनी आता यासंदर्भात आवाज उठवला आहे.


हे ही वाचा :


नाशिक-दिंडोरी मार्गावर बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू