एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... हॉलिबॉल खेळताना पाण्यात उतरला; 20 वर्षीय युवकाचा नदीच्या डोहात बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरात एक दुःखद घटना घडली असून वसिम शेख अन्सारी (राहणार सागर सोसायटी पेण) असं या तरुणाचे नाव आहे.

रायगड: जिल्ह्याच्या पेणमधील (Raigad) भोगावती नदीत (River) बुडून एका 20 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची ह्रदद्रावक घटना घडली. वसीम अन्सारी असं या युवकाचं नाव असून हॉलिबॉल खेळताना हा अपघाताची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अन्सारी कुटुंबीयांवर मोठं दु:ख कोसळलं आहे. दरम्यान, हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमच्या मदतीने वसीमचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. 

रायगड जिल्ह्यातल्या पेण शहरात एक दुःखद घटना घडली असून वसिम शेख अन्सारी (राहणार सागर सोसायटी पेण) असं या तरुणाचे नाव असून मित्रांसोबत भोगावती नदीकिनारी पिंपळडोह येथे हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेला. म्हणून, पाण्यातील बॉल काढण्यासाठी तो गेला असता त्याला दम लागला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. सदर माहिती पेण पोलिसांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पेण येथील अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. परंतु, अनेक तास उलटून गेले तरी त्याचा तपास लागत नव्हता. त्यानंतर  पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमला पाचारण केले. त्यानंतर रेस्क्यू टीमने शोध कार्य सुरू केल्यानंतर साडेतीन तासांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

दरम्यान, नदीच्या डोहातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून वसीमच्या मित्रांनाही शोक अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. 

हेही वाचा

मोठी बातमी! घरगुती वीज ग्राहकांना फायदा, वीजेची कुठलाही दरवाढ नाही, 2030 पर्यंत दरकपात होणार; आदेश जारी

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget