रायगड : रायगड (Raigad) जिल्ह्यातील खोपोलीमध्ये (Khopoli) पोलिसांनी मोठी कारवाई केलीये. खोपोलीतील एमडी ड्रग्ज (Drugs) बनवणा-या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केलाय. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडीया पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावून हा ड्रग्जचा कारखाला चालवला जात होता. यामध्ये 106 कोटी 50 लाखांचं एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलंय. त्याचप्रमाणे याप्रकरणात फरार तीन आरोपींना अटक करण्यात आलीये.
इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली हा एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. तसेच यावेळी पोलिसांनी 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह जवळपास 107 कोटींचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती देण्यात आलीये. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यत एकच खबळब उड्यालाचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
या कंपनीमध्ये हे ड्रग्ज बनवले जातात ही गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला. यामध्ये पोलिसांना 85 किलो म्हणजे 200 ग्रॅमचे एमडी ड्रग्ज सापडले. तसेच पोलिसांनी 15 लाख किमतींची रसायनं देखील जप्त केली आहेत.
सध्या राज्यात ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालल्याचं चित्र आहे. त्यावरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये घमासान होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील सातत्याने या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येते. त्यामुळे आता राज्य शासन या ड्रग्जच्या प्रकरणात कोणती कठोर पावलं उचलणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरेल.
हेही वाचा :