Raigad Grampanchayat Election : राज्यात शिंदे-भाजप सरकार (Shinde-BJP Government) स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections to Local Bodies) लागलेल्या आहेत. सध्या जिल्हा-जिल्ह्यातून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही जिल्ह्यांत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तयारी आपल्याला पाहायला मिळतेय. रायगड (Raigad) जिल्ह्यातील 20 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election) रविवारी म्हणजेच, उद्या 16 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पाडत आहे.
14 ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचनंतर उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत. त्यामुळे आता उमेदवाराकडून छुपा प्रचार सुरू होणार आहे. प्रत्येक पक्षांनी निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असल्यानं अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. यावर्षी विशेष म्हणजे, शिंदे गटाची एन्ट्री झाल्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग आलेला पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या सरकारमध्ये असलेले रायगड मधील चार आमदारांमुळे आपल्या स्थानिक मतदारसंघावरती वर्चस्व राखतील की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.शिंदे गटासाठी पहिल्याच निवडणुका असल्याने ते या निवडणुकीत बाजी मारणार का याकडेही लक्ष लागलं आहे.
रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्यापैकी अलिबाग 3, पेन 1, पनवेल 1, कर्जत 2, खालापूर 4, माणगाव 3, महाड 1, पोलादपूरच्या श्रीवर्धन 1 या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. थेट सरपंच पदांसाठी नागरिकांमधून निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी केली होती. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. अलिबाग तालुक्यातील वेशवी नवगाव कोप्रोली या तीन ग्रामपंचायती मतदान होत आहे. खोपोलीच्या निवडणुकीवरती नागरिकांनी बहिष्कार टाकल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नाही.
रायगड जिल्ह्यातील 20 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांसाठी वीस सरपंच पदांसाठी 26 उमेदवार रिंगणामध्ये आहेत तर 184 सदस्य पदासाठी 298 जण रिंगणात उभे आहेत गेल्या दहा दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. प्रत्यक्ष मतदार भेटीला उमेदवारांनी प्राधान्य दिले होते तर नेत्यांच्या चौकसभा ही घेण्यात आल्या आहेत. उद्या होणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूकांचा निकाल 17 ऑक्टोबर रोजी तहसीलदार कार्यालयात मतदान मोजणी प्रक्रिया होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :