रायगड: मुंबई गोवा महामार्गावर इंदापूरनजीक असणाऱ्या वावे दिवाळी गावाजवळ एका कार अपघातामध्ये पती- पत्नी -चा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. महाड (Mahad) दिशेकडून मुंबई दिशेकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट नदीत कोसळली.  यामुळे कारचा संपूर्ण चक्काचूर झाल्याने या कारमधील देवयानी दशरथ दुदुमकर आणि दशरथ दुदुमकर या दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला. मुंबई गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway) इंदापूर वावे दिवाळी गावाजवळ हा अपघात घडला. सोमवारी सायंकाळी उशिरा हा अपघात घडला होता. या अपघातातील वाहन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यावेळी कारची अवस्था अत्यंत वाईट होती.  (Maharashtra Major Road Accidents)


वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नदीवरील पुलाचा कथडा तोडून खाली कोसळली. ही कार जोरात खाली आदळली. नदीच्या पात्रात फारसे पाणी नव्हते. त्यामुळे खालील दगडांवर कार जोरात आदळली. त्यामुळे संपूर्ण कार चेपली गेली. परिणामी कारमध्ये असणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. 


नाशिकमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसचा अपघात


नाशिकमध्ये लग्नाचे वऱ्हाड घेवून जाणाऱ्या खासगी बस कलंडून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मनमाड - मालेगाव महामार्गावरील चोंडी गावजवळ ही  घटना घडली. या दुर्घटनेत 40 ते 45 प्रवाशी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी खासगी बस कलंडून झालेल्या अपघातात नवरदेवासह ४० ते ४५ वऱ्हाडी किरकोळ जखमी झाल्याची घटना काल रात्री उशिरा  मनमाड - मालेगाव महामार्गावरील चोंडी गावाजवळ घडली. लग्नकार्यासाठी  संगमनेरकडून राजस्थानला  ही बस निघाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. गावकरी वेळेत मदतीला धावून आल्याने पुढील अनर्थ टळला. चोंडी गावाच्या ग्रामस्थांनी मदतकार्य राबवून जखमी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर काहीवेळाने वाहतूक पूर्ववत झाली.


आणखी वाचा


मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत


Ulhasnagar Crime : भाचीला खेळता खेळता चेष्टेत मारलं! चिमुरडी आदळली अन् क्षणात गेला जीव, मृतदेह लपवला पण.. प्रकरण असं आलं समोर