Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. राज्यभरातील 288 विधानसभा जागांपैकी महायुतीला 236 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपला 132, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. विधानसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडील 50 चा आकडा देखील गाठता आला नाही.
रायगड जिल्ह्यात (Raigad District Vidhan Sabha Election) पनवेल, उरण, कर्जत, अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड अशा एकूण 7 विधानसभा मतदारसंघ आहे. यामधील पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी झाले आहेत. तर उरण विधानसभा मतदारसंघातून महेश बालदी यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी, महाडमधून शिवसेना शिंदे गटाने भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे. पेण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रवींद्र पाटील यांनी विजय मिळवला आहे. श्रीवर्धन मतदारसंघातून पुन्हा आदित तटकरे यांनी विजय मिळवला आहे.
पनवेल विधानसभा-
प्रशांत ठाकूर (भाजप) बाळाराम पाटील (मविआ) शेकाप योगेश चिले (मनसे)
विजयी उमेदवार- प्रशांत ठाकूर
उरण विधानसभा-
महेश बालदी (भाजप)मनोहर भोईर (मविआ) ठाकरे गट प्रितम म्हात्रे (शेकाप)सत्यवान भगत (मनसे)
विजयी उमेदवार- महेश बालदी
कर्जत विधानसभा-
महेंद्र थोरवे (महायुती) शिंदे गट नितीन सावंत (मविआ) ठाकरे गटसुधाकर घारे (अपक्ष) बंडखोरी महायुती
विजयी उमेदवार- महेंद्र थोरवे
अलिबाग विधानसभा-
महेंद्र दळवी (महायुती) शिंदे गट चित्रलेखा पाटील (मविआ) शेकापदिलीप भोईर (अपक्ष) बंडखोरी भाजप
विजयी उमेदवार- महेंद्र दळवी
पेण विधानसभा -
रवींद्र पाटील (महायुती)भाजपप्रसाद भोईर (मविआ) उबाठा अतुल म्हात्रे (शेकाप)
विजयी उमेदवार- रवींद्र पाटील
श्रीवर्धन विधानसभा-
आदिती तटकरे -( महायुती) अजित पवार गट अनिल नवगणे (मविआ) श. प. तुतारी गटफैसल पोपेरे (मनसे)
विजयी उमेदवार- आदिती तटकरे
महाड विधानसभा-
भरत गोगावले (महायुती) शिंदे गट स्नेहल जगताप (मविआ) ठाकरे गट
विजयी उमेदवार- भरत गोगावले