Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात (Mumbai Goa Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील वीर रेल्वे स्टेशनजवळ स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिली आहे. या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू तर झाला आहे तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरिल वीर रेल्वे स्टेशनजवळ आज पहाटे. भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यामध्ये अन्य 2 जन गंभीर जखमी झाल्याची महिती मिळाली आहे. अपघातानंतर जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे. स्कॉर्पिओमधील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूला उभी केली असता भरधाव वेगात चिपळूणहून पनवेलकडे दिशेकडे जाणाऱ्या टोईंग व्हॅन क्रमांक MH14CM 309 ने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली. यामुळं ही दुर्घटना घडली.
महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल
दरम्यान, या अपघातात सूर्यकांत सखाराम मोरे राहणार नवेनगर महाड, साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर दोघेही राहणार कुंभारआळी महाड आणि समीर मिंडे (35) राहणार दासगाव महाड या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर उर्वरित दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी टोइंग व्हॅनच्या चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या अपघातात जे दोन जण जखमी झाले आहेत, त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.
पुणे विमानतळाजवळही भीषण अपघात
पुणे विमानतळानजीक भीषण अपघात (Pune Accident) झाल्याची माहिती आहे, या अपघातामध्ये दीर-भावजयचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एअरफोर्सच्या ईसीएच हॉस्पिटलमधून उपचार घेऊन घरी जात असताना वळण घेताना दुचाकी आणि चार चाकी गाडीची समोरासमोर धडक झाल्याने अपघात (Pune Accident) झाला, या घटनेत दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात काल (गुरुवारी) येरवडा ते विमानतळ रस्त्यावर झाला आहे. अपघातामध्ये आशीर्वाद नागेश गोवेकर (वय 52) यांचा जागीच मृत्यू झाला तर, त्यांच्या भावजय रेश्मा रमेश गोवेकर (वय 66) यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या: