Raigad Crime: रायगडच्या रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या वादातून ठेकेदारांना दोघांना लाकडी फाट्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मालकीच्या जमिनीत रस्त्याचे काम सुरू केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांना जबर मारहाण करत ठेकेदाराने लाकडी फाट्याने फोडून काढले. या मारहाणीत दोन्ही सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून या घटनेनंतर जखमी भगत बंधूंनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे ठेकेदारा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय. या घटनेने रोहामध्ये आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास मोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अधिकारी करत आहेत. 


नक्की प्रकरण काय?


शासकीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम किशोर भगत यांच्या मालकीच्या जमिनीतून सुरू होते. या कामाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या किशोर भगत आणि त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर भगत यांना ठेकेदाराने लाकडी फाट्याने मारहाण केली. रायगडच्या रोहा तालुक्यातील तळाघर ग्रामपंचायत हद्दीत बोरघर गावात रस्त्याच्या वादातून दोन सख्या भावांना जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहामध्ये रस्त्याच्या वादातून  गावातील शासकीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम किशोर भगत यांच्या मालकीच्या जमिनीतून सुरू होते. या कामाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या किशोर भगत (30) आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर भगत (33) यांना सब कॉन्ट्रॅक्टर विलास भगत आणि त्याचा मुलगा प्रथमेश भगत यांनी लाकडी फाट्याने मारहाण केली. या मारहाणीमध्ये दोन्ही भाऊ जखमी झाले आहेत.


आरोपी ठेकेदारावर गुन्ह्याची नोंद


या घटनेनंतर जखमी भगत बंधूंनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अधिकारी करत आहेत.घटनेची अधिक चौकशी सुरू असून पोलिसांकडून आरोपींवर योग्य कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.


हत्येचा कट व्यवसायिकाच्याच अंगाशी


मुंबईतील चिराबाजारमधील एका प्रकरणाने खळबळ उडाली असून व्यावसायिक वादातून केलेला हत्येचा कट व्यवसायिकाच्याच अंगाशी आल्याचा प्रकार घडलाय. (Mumbai Crime) महिन्याभरापूर्वी अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात एक नवाच ट्वीस्ट आला असून हा अपघात नसून हत्येचा कट असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातानंतर या प्रकरणातील धागेदोरे समोर आले असून गुन्हे शाखेच्या तपासात हा अपघात हत्येचा कट रचल्या प्रकरणी आता दोन्ही आरोपीवर एलटी मार्गमधील दाखल अपघाताच्या गुन्ह्यातील कलमात हत्येचा प्रयत्न या कलमाची वाढ केली आहे.


हेही वाचा:


Mumbai Crime: डाव फसला! तो अपघात नव्हताच, मुंबई पोलिसांच्या हाती लागले धक्कादायक पुरावे, व्यावसायिकाचा कट....