MLA Yogesh Kadam Accident News: राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्रच सुरु आहे की काय? असा प्रश्न पडत आहे. कारण आता आमदार योगेश कदम (Yogesh Kadam Accident) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे.


या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे.
आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली.


 यानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला आहे.  आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.  या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


कशेडी घाटात टॅंकरनं योगेश कदमांच्या गाडीला जोरात धडक दिली. यात योगेश कदम यांच्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर टँकरचालक हा पळून गेल्याची माहिती आहे. योगेश कदम हे या अपघातात सुखरुप आहेत, अशी माहिती मिळाली आहे. 


योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड  मतदारसंघातून आमदार आहेत. ते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आहेत. शिवसेनेत फुट पडून शिंदे गटाची निर्मिती झाल्यानंतर रामदास कदम यांनी ठाकरे गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत शिंदे गट जवळ केला. 


राज्यात गेल्या काही दिवसात नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढल्या


राज्यात गेल्या काही दिवसात नेत्यांच्या रस्ते अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. आमदार विनायक मेटे (vinayak mete) यांचा पुणे-मुंबई हायवेवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा देखील भीषण अपघात झाला होता. तर दोन दिवसांपूर्वी आमदार धनंजय मुंडे (dhanjay Mundde)  यांच्या गाडीला देखील अपघात झाल्यानं त्यांना मार लागला होता. 


ही बातमी देखील वाचा