रायगड : रायगडच्या महायुतीकडून (Mahayuti) सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) अनंत गीते (Anant Geete) हे लोकसभा  (Loksabha Election)निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हे दोन्ही नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. मात्र ही जागा सध्या एका आगवळ्यावेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. येथे तटकरे आणि गीते यांच्यात थेट लढत होणार आहे, असं म्हटलं जातंय. मात्र या दोन्ही उमेदवारांची वेगळ्याच कारणामुळे डोकेदुखी वाढली आहे. येथे गीते आणि तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या व्यक्तींनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे येथे या दोन्ही प्रमुख उमेदवारांपुढे मतफुटीचा धोदका निर्माण झआला आहे. 


निवडणुकीच्या रिंगणात तीन अनंत गीते


रायगडच्या निवडणुकीत अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्यासारखेच नाव असणाऱ्या आणखी दोन अनंत गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून अनंत गीते अनंत बाळोजी गीते नावाच्या दोन व्यक्तींनीदेखील अपक्ष म्हणून आपला अर्ज भरला आहे. तर अनंत गंगाराम गीते हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. म्हणजेच येथे अनंत गीते नावाचे एकूण तीन उमेदवार झाले आहेत. अनंत गीते यांच्या नावात साधर्म्य असलेल्या व्यक्तींना उभे करून त्यांची कोंडी करण्यासाठी विरोधकांनी ही चाल खेळल्याचं बोललं जातयं. 


तटकरेंच्या नावाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीचाही अर्ज


तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यादेखील नावात साधर्म्य असणाऱ्या व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या सुनील दत्ताराम तटकरी या व्यक्तीनेदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेटवची तारीख ही 22 एप्रिल आहे. त्यामुळे आगामी काळात नावात साधर्म्य असणाऱ्या व्यक्ती आपले अर्ज मागे घेणार का? असा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. 


2014 साली काय घडलं होतं? 


नावात साधर्म्य असल्यामुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना काय फटका बसू शकतो, हे 2014 सालच्या निवडणुकीत दिसून आले होते. सुनिल तटकरे यांनी 2014 सालची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तटकरे यांचा अवघ्या दोन हजार मतांनी विजय पराभव झाला होता. याच निवडणुकीतही तटकरे यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या सुनिल तटकरे नावाच्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवली होती. या तटकरे नावाच्या व्यक्तीला तब्बल 9 हजार 849 मते पडली होती. म्हणजेच नावात साधर्म्य असल्यामुळे सुनिल तटकरे यांची मते त्यांच्या नावात साधर्म्य असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला पडली होती, आणि खऱ्या सुनिल तटकरेंचा पराभव झाला होता. असाच प्रकार 1991 सालच्या निवडणुकीत घडला होता. त्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्तीला काँग्रेसने उभे केले होते. त्याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता.


अशीच खेळी यावेळीदेखील खेळण्यात आली आहे. त्यामुळे अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांना यावेळी काय फटका बसणार? नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हेही वाचा :


मैदान तेच, उमेदवारही तेच, तटकरे की गीते? कोण करणार 'रायगड' सर? 


एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा, मंडलिकांची डोकेदुखी वाढली, एका निर्णयामुळे कोल्हापुरात निवडणुकीचं गणित बदलणार?