एक्स्प्लोर

Pune Accident News: बांधकाम इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू; कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड काढत असताना एका मजूराचा दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला.

Pune Accident News: बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड काढत असताना एका मजूराचा दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. पुण्यातील बी टी कवडे रोडवरील निगडेनगर या ठिकाणी ही धक्कादायक धटना घडली. संदीप रामकिशन कुमार असं 28 वर्षीय मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
 
घडल्या प्रकरणी आदित्य रामकिशन कुमार यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार आणि मालकावर गुन्हा दाखल केला आहे. इमारतीचे मालक रघु माणिक्कम जाधव आणि ठेकेदार सुरेश तुळशीराम कसबे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहे. दोघेही मांजरी परिसरात रहायला आहेत. 

रघु जाधव यांच्या मालकीच्या इमारतीचे काम ठेकेदार सुरेश कसबे हे करत आहेत. संदीप कुमार हा दुसर्‍या मजल्यावरुन पहिल्या मजल्याच्या स्लॅबच्या कडेने लावलेले प्लायवूड कटावणीने काढून घेत होता. हे काम करताना त्याला सेफ्टीबेल्ट, हेल्मेट तसेच संरक्षक जाळी असे कोणतेही साहित्य पुरविण्यात आले नाही. त्याकडून धोकादायकरित्या काम करवून घेत असताना तो दुसर्‍या मजल्यावरुन खाली पडून त्याचा मृत्यु झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पून्हा एकदा मजूरांच्या सुरक्षिततेचा मुद्धा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

यापुर्वी देखील अशीच घटना सिंहगड रोडवरील जयदेव नगर परिसरात घडली होती. त्यावेळी  16 व्या मजल्यावरून डक्टमध्ये पडून एका महिला कामगाराचा मृत्यू झाला होता. मीनाकुमारी साहू असे 41 वर्षीय काम करणाऱ्या मृत महिलेचं नाव होतं. त्यावेळी देखील सेफ्टी किट किंवा संरक्षणासाठी कोणतीही सामग्री न पुरवल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.


कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

पुण्यात अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती बांधकाम करण्यासाठी राज्याबाहेरुन कामगार आणले जातात. त्यांच्या राहण्याची सोय केली जाते. त्यांना योग्य वेतन मिळत असल्याने अनेक कामगार महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात येतात. मात्र त्यांच्यासोबत होणाऱ्या अपघातांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. ठेकेदारांकडून त्यांची सगळी सोय करण्यात येते मात्र काम करायच्या ठिकाणी त्यांना सुरक्षा उपकरणं पुरवले जात नाहीत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदाराची असते मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटनांचं प्रमाण वाढत आहे. या आधीसुद्धा येरवड्यात जाळी पडून कामगाराचा मृत्यू झाला होता. कामगारांच्या जीवाची पर्वा ठेकेदार करत नसल्याचं चित्र अनेकदा बघायला मिळालं आहे. त्यामुळे कामाराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Embed widget