एक्स्प्लोर
मैत्रीणीचे अश्लील फोटो काढून खंडणी उकळणाऱ्या तरुणाला अटक
पुणे : मैत्रीणीचे अश्लील फोटो काढून तीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 18 वर्षीय आरोपीनं कोल्डड्रींकमधून मैत्रीणीला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर तीचे अश्लील फोटोही काढले. या फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्या अथर्व सोनवणेला अटक करण्यात आली आहे.
अथर्वनं त्याच्याच बिल्डिंगमधील एका मुलीला गुंगीचं औषध पाजत ब्लॅकमेल केलं आहे. ही तरुणी अथर्वच्या चांगल्या ओळखीतील होती. एकाच सोसायटीमध्ये राहात असल्यानं दोघांची चांगली मैत्री होती. आरोपी तरुणाचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून नव्या घरी राहायला गेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांचा संपर्क वाढला. कॉफीच्या बहाण्यानं आरोपीनं तरुणीला घरी बोलावलं होतं. चांगली मैत्री असल्यामुळे तरुणीही त्याच्या घरी गेली. मात्र कॉफीमध्ये गुंगीचं औषध घालून अथर्वनं तरुणीचे अश्लिल फोटो काढले. या फोटोंचा धाक दाखवत त्यानं तरुणीकडून तब्बल सव्वा लाखांची रक्कम उकळली आहे.
सव्वा लाखांची रक्कम उकळल्यानंतर आरोपीनं पुन्हा तरुणीकडे 50 हजारांची मागणी केली. मात्र यावेळी घाबरलेल्या तरुणीनं घरी हा सारा प्रकार सांगितला आणि पोलिसात धाव घेतली. आरोपी तरुणानं तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तपास सुरु करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement