एक्स्प्लोर

Pune Yerwada jail : Pune yerwada jail : येरवडा कारागृहातील कैदी भिडले; अंडरट्रायल कैद्यावर धारदार वस्तूने वार

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने सोमवारी पहाटे धारदार टिनच्या तुकड्याने हल्ला करून एका अंडरट्रायल कैद्याला गंभीर जखमी केले.

पुणे येरवडा मध्यवर्ती  ( Yerwada Jail)   कारागृहात कैद्यांच्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुन्हा एकदा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने सोमवारी पहाटे धारदार टिनच्या तुकड्याने हल्ला करून एका अंडरट्रायल कैद्याला गंभीर जखमी केलं आहे. येरवडा पोलिस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 8 मधील मोकळ्या व्हरांड्यात ही घटना घडली आहे.

नुकताच न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात दाखल झालेला अंडरट्रायल कैदी रुषभ शेवाळे याच्यावर बारामती येथील रोहन अविदास माने या आणखी एका कैद्याने हल्ला केला. शेवाळे यांच्या गालावर आणि डोळ्यावर आणखी एक जखम झाली. त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या कारागृहाच्या रक्षकांनी माने यांना जबरदस्तीने पकडलं आहे. माने यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 324 नुसार धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं येरवडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितलं.

काही दिवसांपूर्वी कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक

काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात हा राडा झाला होता. दगडफेक सुरु असताना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदाराला कैद्याच्या जमावाने मारहाण देखील केली होती. त्यामुळे येरवडा कारागृहात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच कैद्यांवर कारवाई केली होती. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्या न्यायालयीन कैद्यांची नावं होती. 

जागा कमी अन् कैदींची संख्या दुप्पट

येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.

इतर महत्वाची बातमी-

Sasoon Hospital Drug Racket Pune : श्रीमंत आरोपींचे दुसरे घर म्हणजे 'ससून रुग्णालय'? आजारांची कारणं देत आरोपींचा मुक्काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget