पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. तर, सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधण्यात येत असून सध्या सीएनजी (CNG) वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चलती असल्याचं पाहायला मिळते. त्यातच, आता बजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाईक लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लाँचिंग सोहळा पार पडला. यावेली, ही सीएनजी बाईक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बजाजकडून (Bajaj) करण्यात आला आहे.  पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक असून 2 किलो सीएनजीमध्ये तुम्ही 230 किमी प्रवास करू शकता.  तर, 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजीमध्ये तुम्हाला 330 किमीचा टप्पा गाठता येईल. 


पेट्रोलच्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची आता लवरकरच मुक्तता होणार आहे. कारण, बजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाईकची निर्मिती केली. ज्या बाईकचं अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते झालं. जगातील ही पहिली सीएनजी बाईक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळं दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सीएनजी बाईक ही "बजाजची गॅरंटी" आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात 'नितीन गडकरींची गॅरंटी' असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्र्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपची देशभरात कमतरता आहे, या सीएनजी पपंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. या अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. तर, नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात बोलताना बाईकच्या किंमतीबाबत अपेक्षा व्यक्त केली.



याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, या सीएनजी बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी. प्रदूषणमुक्त भारत करण्याचं माझं सर्वात मोठं ध्येय आहे. त्याअनुषंगाने सीएनजी बाईक या ध्येयाला मोठा हातभार लावेल यात शंका नाही. वाहन उद्योग क्षेत्रात भारताचा आधी जगात सातवा नंबर होता. आता, अलीकडच्या तीन महिन्यांपूर्वीच आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहचलो आहोत. पहिलं यूएसए, दुसरं चायना आणि मग भारताचा नंबर लागतो. आपण वाहन उद्योग क्षेत्रात भरारी घेतोय, असे गडकरी यांनी या बाईक लाँचिंग सोहळ्याप्रकरणी बोलताना म्हटले. 






बाईकची किंमत 1 लाखांपेक्षा कमी असावी


सीएनजी बाईकची किंमत एक लाखापेक्षा कमी असावी, अशी बजाजकडून अपेक्षा आहे. त्यामुळं ही बाईक चांगली प्रचलित होईल. एकदा टाकी फुल केली की ही बाईक 230 किलोमीटरचं एव्हरेज देईल, असा दावा केला जात असून ही महत्वाची बाब आहे. पण, या बाईकमध्ये सीएनजीची टाकी कुठं आहे. हे शोधून काढायचं म्हणजे एक संशोधनाचा भागच आहे. बजाज कंपनीने ज्या पद्धतीने या बाईकची निर्मिती केलीये, यासाठी त्या प्रत्येकाचे नितीन गडकरी यांनी अभिनंदन केले. बाईक निर्मित्ती प्रक्रियेत असलेल्या प्रत्येकाचे टीमवर्क म्हणून गडकरींकडून अभिनंदन करण्यात आले. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI