पुणे : महिलांच्या विविध रोगांसाठी  (International Womens Day 2024) अनेक प्रकारचे उपाय आणि उपचार पद्धती उपलब्ध आहेत. पण शारीरिक आरोग्यावर उपाय आणि उपचार उपलब्ध आहे. मात्र सध्या जगात सगळीकडेच मानसिक आरोग्याचा (Mental Health) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. शारीरिक आरोग्यासाठी उपचार अनेक महिला घेतात मात्र याच महिलांच्या मानसिक आरोग्याचं काय?, असा प्रश्न कायम उपस्थित राहतो. महिला मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात का? किंवा महिला मानसिक आरोग्याकडे कितपत लक्ष देतात?, त्यासाठी नेमकं काही थेरपी घेतात का?, याकडेही सध्या लक्ष देण्याची गरज आहे. 


मणिपाल हॉस्पिटल खराडीच्या  स्त्रीरोग तज्ञ आणि मानसिक आरोग्य सल्लागार असलेल्या डॉ. रुषाली जाधव या मागील अनेक वर्षांपासून स्त्रियांच्या मानसिक आण शारीरिक आजारांवर काम करत आहेत. त्या सांगतात की, महिलांच्या मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेताना, या गोष्टीचा देखील विचार करणे गरजेचे आहे की त्यांच्या मानसिक आरोग्याशी निगडीत समस्या पुरुषांच्या मानसिक समस्यांपेक्षा  वेगळ्या असतात. अलीकडच्या संशोधनानुसार, पुरुष आणि स्त्रियांच्या मेंदूच्या रचनेतील फरकामुळे स्त्रियांना नैराश्यासारख्या मानसिक समस्या होण्याचे प्रमाण जास्त असते.


महिला मानसिक आरोग्याशी निगडीत अनेक प्रकारच्या समस्या अनुभवत असतात, जशा की, चिंता, दुःख, खाण्यापिण्यासंबंधी विकार आणि PTSD (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर). या समस्या सामाजिक दबाव, हॉरमोनचे चढउतार, अत्याचार आणि छळ यांसारख्या अनेक गोष्टींमुळे या समस्या उद्भवू शकतात. मात्र या समस्यांचा सामना करत असलेल्या अनेक महिला मानसिक समस्येवर मोकळेपणाने बोलत नाही. त्यामुळे मानसिक आजारांवर उपाय घ्यावे लागतात हे अनेक महिल नाही, असंही त्या सांगतात.  


• चिंता विकार (Anxiety disorder) म्हणजे खूप जास्त चिंता आणि भीती. महिलांशी संबंधित मानसिक समस्यांमध्ये हा विकार अगदी सामान्य आहे. विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधण्याचे आव्हान आणि विवियध कौटुंबिक अपेक्षा यामुळे चिंतेचे, काळजीचे प्रमाण वाढते.


• नैराश्य (Depression) यात सतत दुःख आणि निराशेची भावना जाणवते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक आढळते.


• संप्रेरकांचे असंतुलन (Hormone Inbalance): तणाव आणि नात्यांमधील समस्यांसारख्या मानसिक त्रासामुळे
 नैराश्याची लक्षणं वाढतात


• आघात आणि छळ (Trauma and Abuse): यामध्ये लैंगिक छळ किंवा कौटुंबिक हिंसेचा समावेश होतो. यातून PTSD आणि इतर मानसिक विकार उद्भवू शकतात, ज्यामुळे स्त्रिच्या भावनिक आरोग्यात गुंतागुंत वाढते.


शारीरिक आरोग्यावर मानसिक आरोग्याचा किती प्रभाव?


मानसिक आरोग्याचा आपल्या एकंदर आरोग्यावर खूप मोठा प्रभाव असतो. निरोगी मानसिक स्थिती सांभाळता आली, तर शारीरिक आरोग्याचे रक्षण करण्यास मदत होते आणि काही गंभीर वैद्यकीय विकार होण्याची शक्यता कमी करता येते. दुसरीकडे, मानसिक आरोग्य चांगले नसेल, तर शारीरिक आरोग्य देखील बिघडू शकते.


झोपेच्या समस्या


मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या लोकांना निद्रानाश किंवा स्लीप अॅप्नीया (झोपेत श्वसनक्रिया बंद होणे) सारखे झोपेसंबंधीचे विकार होण्याची शक्यता अधिक असते. निद्रानाशात झोप लागत नाही किंवा गाढ झोप लागत नाही पण स्लीप अॅप्नीयामध्ये श्वसनक्रियेवर परिणाम होतो, ज्यामुळे वरचेवर जाग येते.


महिलांच्या वैद्यकीय समस्यांवर स्वाभाविक उपचार असू शकतात, पण त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या मात्र बऱ्याचदा लपवल्या जातात किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन, त्याबाबत जागरूकता आणून आणि स्त्रियांना आधार वाटेल असे वातावरण निर्माण करून आपण स्त्रियांना शारीरिक, भावनिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य जपण महत्वाचं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Women's Day 2024: "मी Menstrual Hygiene ची काळजी घेणार"; आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रत्येक महिलेनं स्वतःला वचन द्यायलाच हवं!