Mangaldas Bandal: पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्या निवासस्थानी काल(मंगळवारी) ईडीने कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती असलेल्या बांदल (Mangaldas Bandal) यांच्या पुण्यातील महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये बांदल (Mangaldas Bandal) यांच्या दोन्ही निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान चार वेळा नोटीस आलेले आणि आता ईडीने कारवाई केलेले मंगलदास बांदल चांगलेच चर्चेत आले आहेत.(who is mangaldas Bandal)


कोण आहेत मंगलदास बांदल?


पुणे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावांच्या वारंवार चर्चा केल्या जातात. पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. 50 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांना 2020 मध्ये निलंबित करण्यात आले होते. शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्वाचा राजकीय चेहरा म्हणून बांदल (Mangaldas Bandal) यांची ओळख आहे. त्यांच्यावर वारंवार पक्षबदलाचे आरोप देखील केले जातात.


पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी बांदल यांना 26 मे 2021 रोजी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्यामुळे बांदल तब्बल वीस महिने तुरुंगात होते. बांदल यांना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ते जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आले होते.


 


मंगलदास बांदल यांंच्या निवासस्थानी पडलेल्या छाप्यात काय सापडलं?


बांदल (Mangaldas Bandal) यांच्या शिक्रापूर येथील निवासस्थानी कागदपत्रांची आणि कुटुंबीयांच्या बँक लॉकरची तपासणी अधिकाऱ्यांनी केल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. या छाप्यांमध्ये 5 कोटी 60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचेही सांगण्यात येत आहे. तर मंगलदास बांदल यांच्याकडे पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किमतीची चार मनगटी घड्याळे ही आढळून आली आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 16 तासांहून अधिक कारवाई केली आहे. मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. 




लोकसभेची उमेदवारी झाली होती रद्द?


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, इंदापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप मेळाव्याला बांदल यांनी हजेरी लावल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती.अशातच येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल या शिरूर-हवेलीमधून तयारी करीत असल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर बांदल यांच्यावर 'ईडी'ची छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.


संबधित बातम्या- मोठी बातमी: मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींचं घबाड सापडलं, 16 तास संपत्तीची मोजदाद


VIDEO-  Mangaldas Bandal Arrested : मंगलदास बांदल यांना ईडीची अटक; घरात 60 लाख रुपयांची रक्कम आढळली