Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे शहर परिसरातील काही भागातील पाणीपुरवठा उद्या(गुरूवारी) बंद (Pune Water Cut) राहणार आहे. महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि टाक्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी उद्या (गुरुवारी दि. 22) शहराचा पाणीपुरवठा बंद (Pune Water Cut) राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र परिसर आणि या अंतर्गत येणारे पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचआयईआर टाकी परिसर व पर्वती टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी., खडकवासला जॅकवेल, नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वडगाव जलकेंद्र परिसर येथील विद्युत, पंपिंगविषयक व इतर देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या सर्व भागाला शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (Pune Water Cut)
कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?
पाणीपुरवठा बंद असणारा भाग : पर्वती एमएलआर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ. लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर इत्यादी.
पर्वती आयआयएलआर टाकी परिसर : सहकारनगर, पद्मावती, 'बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलेसबरी पार्क, कोंढवा खुर्द, साईबाबानगर. पर्वती एलएलआर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर.(Pune Water Cut)
एस. एन. डी. टी. (एम. एल. आर.) टाकी परिसर : गोखलेनगर शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, सेनापती बापट रोड, जनवाडी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर जनवाडी, वैदवाडी, वडारवाडी, पोलिस लाईन, संगमवाडी.
एस. एन. डी. डी. (एच. एल. आर) : गोखलेनगर, औध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत भागेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉल्स भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, पौड रोड, अद्वैत सोसा, गोसावी वस्ती परिसर, यासह शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद (Pune Water Cut) राहणार आहे, त्यामुळे आवश्क तो पाणीसाठा आज करून ठेवण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.