Asha Buchake : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या भाजपच्या नेत्या आशा बुचकेंना (Asha Buchake) डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून अजित पवारांवर (Ajit Pawar) तोफ डागली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपला डावलून घेतलेली जुन्नरच्या पर्यटनाची बैठक ही शासकीयचं होती. असा पुनरुच्चार बुचकेंनी केला त्याचबरोबर पुरावा म्हणून तहसीलदारांच्या सहीने तयार झालेला बैठकीचा अजेंडा दाखवला.


त्यामुळं माझा रोष हा जिल्हा प्रशासनावर आहे. हेच प्रशासन अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार अतुल बेनकेंच्या (Atul Benke) कारभाराला बळी पडत आहेत. आता पालकमंत्री यांच्यावर कारवाई करणार आहेत का? असा प्रश्न आशा बुचकेंनी थेट अजित पवारांना विचारला आहे. 18 ऑगस्टला जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत आली, तेंव्हा काळे झेंडे दाखवत बुचकेंनी चांगलाच राडा घातला होता. या राड्यानंतर उच्च दाबाच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. मात्र डिस्चार्ज मिळताच त्यांनी पालकमंत्री अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) पुन्हा हल्लाबोल केला.


राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जेव्हा जुन्नर विधानसभेत पोहचली तेव्हा त्या ठिकाणी भाजपच्या नेत्या आशा बुचके (Asha Buchake) आणि समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट पालकमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar)  ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. या संपूर्ण प्रकारानंतर आशा बुचके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, ब्लड प्रेशर लो झाल्यानंतर आशा बुचके यांना अचानक भोवळ आली त्यानंतर त्यांना नारायणगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


नेमकं प्रकरण काय?


 भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) या 18 ऑगस्टला काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली असताना इथे हा प्रकार घडला.त्याचवेळी जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचकेंनी (Asha Buchake) पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं.


देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकला आहे. शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचकेंनी केला आहे. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचकेंनी (Asha Buchake) अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे.