एक्स्प्लोर

पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली?

पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे.

पुणे : पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाच्या परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. कालवा फुटण्यामागे कारण काय? पर्वती भागातील मुठा कालव्याची भिंत फुटण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं, तरी स्थानिक नागरिकांनी काही कारणं सांगितली आहेत. अनेक नागरिकांनी संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त करत, कालव्याच्या भिंतीला धोका असल्याचे माहिती असूनही दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोपही प्रशासनावर केलाय. पर्वती परिसरातील कालव्याला धोका आहे, कालव्याची भिंत फुटू शकते, यासंदर्भातील माहिती इथले स्थानिक नागरिक वेळोवेळी प्रशासनाला देत होते. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे गांभिर्याने पाहिलं जात नव्हतं. कालव्याची भिंत ज्या ठिकाणी फुटली आहे, त्या ठिकाणी केबलचं काम सुद्धा चालू होतं. हे काम त्या दुर्घटनेला कारणीभूत ठरलं का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. PHOTO : कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर मुठा कालव्याची भिंत फुटलेल्या ठिकाणी खड्डा होता. त्या खड्ड्यात लाकडाचा ओंडका टाकून खड्डा बुजवण्यात आला होता. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकाने आरोप केला आहे. या कालव्याला धोका आहे, हे आधीपासूनच माहित असतानाही प्रशासनाने दखल घेतली नाही, असा आरोप होत आहे. कालव्याची देखभाल करण्याची जबाबदारी जलसंपदा विभाग आणि महापालिकेची असते. नेमकी दुर्घटना काय? पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.  पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं. या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभऱ पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही. दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो. जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे. VIDEO : मुठा कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Kumbhar MPSC Protest: MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती
MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Delhi CJP protest Jean Dreze: दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
दिल्लीतील सरकारविरोधी आंदोलनातील 'तो' परदेशी व्यक्तीची कोणी सोम्यागोम्या नव्हे तर आहे विख्यात अर्थतज्ज्ञ, कोण आहेत ज्यां द्रेज?
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Embed widget