एक्स्प्लोर

Walmik Karad Surrender: वाल्मिक कराडच्या एका निर्णयाने सगळेच चक्रावले, सीआयडीसमोर हजर झाल्याने सगळेच संभ्रमात

Walmik Karad Surrender: बीड पोलिस तपास करत असताना वाल्मिक कराड सीआयडीसमोर का झाला हजर? याबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.

Beed Walmik Karad Surrender : बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आज अखेर पुण्यातील सीआयडीला शरण आला आहे. पुण्यातील सीआयडी ऑफीसमध्ये कराडने शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मिकीने एक व्हिडिओ शेअर करून मोठा दावा केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन जवळपास 22 ते 23 दिवस उलटले आहेत. वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर त्याचा तपास बीड पोलिस घेत होते, मात्र आजच वाल्मिक कराड पोलिसांकडे न जाता पुण्यात सीआयडीसमोर का शरण आला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

खंडणीचा गुन्हा बीड पोलिसांकडे तर हत्येचा गुन्हा सीआयडीकडे

खंडणीचा गुन्हा बीड पोलिसांकडे आहे आणि हत्येचा गुन्हा सीआयडीकडे आहे. दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. एकीकडे वाल्मिक कराडने आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, खंडणीचा खोटा गुन्हा त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे, तर हत्येच्या गुन्ह्यामध्ये आपला काही संबंध नाही या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना पकडावं असं आपल्या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड म्हणतो आहे, मग असं असताना तो स्वतःहून सीआयडीच्या हवाली का झाला? बीड पोलीस देखील त्याचा शोध घेत होते. त्यामुळे त्यांनी पुण्यात सीआयडी समोर हजर होणार संभ्रम निर्माण करणार आहे, एकीकडे बीड पोलीस देखील त्याचा शोध घेत असताना त्याने सीआयडी ची निवड का केली असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान वाल्मिक कराडला वैद्यकीय तपासणी नंतर केजच्या न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. वाल्मीक कराड वर दाखल खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला आहे.

तर मी शिक्षा भोगायला तयार - वाल्मिक कराड

मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

वाल्मीक कराड शरण येण्यापूर्वी काय काय घडलं?

वाल्मीक कराड पुण्यात सरेंडर करणार अशा २ दिवसांपूर्वी चर्चा

सकाळी 7 वाजता: पुण्यातील सी आय डी ऑफिस बाहेर आज वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते आले एकत्रित

सकाळी 9 वाजता: सी आय डी ऑफिस बाहेर माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सकाळी 10 वाजता: पुणे पोलीस दलातील उपायुक्त संदीप गिल आणि  गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे सी आय डी ऑफिस बाहेर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल

सकाळी 11 वाजता: 12 ते 1 दरम्यान वाल्मीक कराड सी आय डी  कार्यालयात दाखल होणार अशी माहिती समोर

दुपारी 12 वाजता: पुणे सी आय डी कडे सरेंडर करणार असल्याचे स्वतः वाल्मीक कराड याने व्हिडिओ केला शेयर

दुपारी 12.15 वाजता: MH23 BG 2231 स्कॉर्पिओ या वाहनातून चेहरा लपवत वाल्मीक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल 

दुपारी 1 वाजता: सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्याकडून वाल्मीक कराडची चौकशी सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget