Pune Auto Rikshaw Tow Mercedes: गाडीतील इंधन अचानक रस्त्यावर संपल्यावर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडते. त्यात जर पेट्रोल पंप जवळ नसेल तर मग विचारायलाचं नको. तसंच रस्त्यावर आजूबाजूला प्रत्येकजण घाईत असतो त्यामुळे त्यांच्याकडुन मदतीची अपेक्षा मिळणे देखील कठीण असते. मात्र पुणे याला अपवाद आहे. जे कुठेच पाहायला मिळणार नाही ते पुण्यात मात्र नक्की पाहायला मिळेल. सध्या पुण्यातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक मर्सिडीज (Mercedes Benz Car) कारला चक्क रिक्षेची मदत घ्यावी लागली.
Pune Auto Rikshaw Tow Mercedes: रिक्षाचा मर्सिडीजला दे धक्का
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हा व्हिडीओ आहे. पुण्यातील एका रिक्षाचालकाने इंधन संपत आलेल्या मर्सिडीजची (Mercedes Benz Car) मदत केली आहे. खरं तर एक आलिशान मर्सिडीज कार इंधन संपल्याने भररस्त्यातच बंद पडली. मात्र एका रिक्षाचालकाने ही मर्सिडीज थांबू दिली नाही. त्याने हाताने रिक्षेचं स्टेअरिंग धरत रिक्षा चालू ठेवली तर त्याचवेळी जवळील मर्सिडीजला पायाने धक्का दिला त्यामुळे बंद पडलेली मर्सिडीज रस्त्यावर धावू लागली.
यातच 1,500 किलोपेक्षा जास्त वजनाची कार ढकलणे सोपे नाही. विशेषतः ऑटोरिक्षाच्या मदतीने. खराब झालेल्या कारला ढकलण्याचा हा सर्वोत्तम मार्ग नाही, परंतु जर तुम्ही अडचणीत असाल तर नक्कीच तुम्ही अशाच युक्त्या शोधत असाल. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पुण्यातच मर्सिडीज बेंझच्या सीईओची कार ट्रॅफिक जॅममध्ये अडकली होती. मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले होते की, ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या कारमधून बाहेर पडून ऑटोमध्ये बसावे लागले.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI