Mahindra Will Invest 10 Thousand Crores in Maharashtra: महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) महाराष्ट्रात 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनी पुण्यात (Pune) इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट उभारणार आहे. याला महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मान्यताही मिळाली आहे. याबद्दल बोलताना महिंद्रा ग्रुपचे सीईओ आणि एमडी अनिश शाह (Anish Shah) यांनी म्हटलं आहे की, आमच्या उद्योगाला हिरवा कंदील मिळाला आहे. महिंद्राच्या नवीन EV उत्पादन युनिटने मेक इन महाराष्ट्रद्वारे परदेशी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आणले आहे. तसेच EV सहायक युनिट्ससाठी दरवाजे उघडले आहेत. असं ते ट्वीट करून म्हणाले असून त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे.






महाराष्ट्र हे महिंद्राचे गृहराज्य : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 


अनिश शाह (Anish Shah) यांच्या ट्विटला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत की, महाराष्ट्र हे महिंद्राचे (Mahindra & Mahindra) गृहराज्य आहे. इथे नाही तर कुठे, असं ते आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना टॅग करत म्हणाले आहेत. ते म्हणाले, उद्याच्या ग्रीनरीसाठी,  स्वच्छतेसाठी सर्वोत्कृष्ट काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सशक्त महाराष्ट्र, सशक्त भारतासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक असल्याचं म्हणत त्यांनी महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत.






दरम्यान, महिंद्राच्या पुणे (Pune) प्लांटच्या निर्मितीसाठी 7 ते 8 वर्षांचा कालावधी लागू शकतो. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे. याशिवाय कंपनी 5 इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करणार, ज्यातील पहिली इलेक्ट्रिक कार 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते.