पुणे : मी सावरकर भक्त आहे. सावरकरांचा अभ्यास केला आहे. ज्यांना सावरकर कळाले नाही. ज्यांना समजावून घेण्याची इच्छा नाही किंवा ब्राह्मणांचा तिरस्कार करणे एवढेच माहित आहे ते सावरकरांवर टीका करतात. ज्यांना समाजात किंमत नाही ती किंमत वाढवण्याकरता किंवा ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद नेतेपदासाठी लढवत ठेवायचा आहे त्यांना सावरकर कळणार नाही. सावरकर फक्त एक ब्राह्मण आहे म्हणून त्यांच्याविरुद्द रान उठवलं जात असल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले आहे.


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) यावर्षी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा ‘पीफ डिस्टिंग्वीश’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

Sanjay Raut | महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्या, संजय राऊतांचे उदयनराजेंना आव्हान | सातारा | ABP Majha



गोखले म्हणाले, सावरकरांच तैलचित्र काढणाऱ्या सोनिया गांधी यांना सावरकर माहित नाही. सोनिया गांधी यांनी सावरकरांविषयी काही वाचले नाही त्यामुळे त्यांना सावरकरांवर भाष्य करण्याचा काही अधिकार नाही. राहुल गांधी यांना सावरकार काय माहिती? सावरकरांवर माफीचा आक्षेप घेतला जातो. त्यांना त्यामागची भुमिका माहिती आहे का? स्वाचंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी हे देव नव्हते माणसं होती. त्यामुळे त्यांच्याकडून चुका होऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करणं हे चुकीचं आहे. शरद पवारांसारखा माणूस मला जाणता राजा म्हणा असं कधीही म्हणणार नाही. यावर मी विश्वास ठेवणार नाही, असेही गोखले यावेळी म्हणाले.

संबंंधित बातम्या : 

आम्ही राजघराण्यात जन्माला आलो याचे काय पुरावे द्यायचे, छत्रपतींच्या वंशजांना पुरावा मागितल्यावरून राऊतांवर टीकेची झोड

गडकरींचं 'विकासकामात लोकप्रतिनिधींचा अडथळा' असल्याचं वक्तव्य भाजपच्या 'त्या' नेत्यासाठी, खैरेंचा रोख कुणाकडे?