पुणे: पुणे रेल्वे स्थानकात उत्तर भारतीय आणि RPF कर्मचाऱ्यांमध्ये काल रात्री तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये धारदार शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याने RPF चा एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
RPF चे कर्मचारी गावाकडे जाणाऱ्या उत्तर भारतीयांकडून पैश्याची लूट करत असल्याच्या कारणावरुन वाद झाला. यावेळी तक्रार दाखल करण्याऐवजी 23 -30 जणांच्या जमावाने RPF कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात RPF अधिकारी जखमी झाला आहे. या प्रकारामुळे पुणे रेल्वे स्थानकात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
घटनेनंतर परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून 3 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.