भीमाशंकर (पुणे) :  पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून परतत असताना भाविकांच्या एका खाजगी बसला भीषण अपघात झाला असून यामध्ये दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 36 भाविक या अपघातात जखमी झाले आहेत.

भीमाशंकरजवळील पोखरी घाटामध्ये रस्त्यावर बस पलटल्यानं हा अपघात झाला. काल रात्री भीमाशंकरहून परतत असताना रात्री 11च्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तब्बल 36 जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, जखमींना घोडेगाव, मंचर आणि पुणे येथील रुग्णालयात उपचारारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व भाविक ओदीशामधील असल्याची माहिती समजते आहे.