एक्स्प्लोर

M.Phil मान्यताप्राप्त पदवी नाही, प्रवेश घेऊ नका, युजीसीकडून विद्यार्थांना सूचना

पुणे : मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात M.Phil ही मान्यताप्राप्त पदवी नाही, त्यामुळे एम. फील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने विद्यार्थ्यांना सावध केले आहे.

पुणे : मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात M.Phil ही मान्यताप्राप्त पदवी नाही, त्यामुळे एम. फील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसीने विद्यार्थ्यांना सावध केले आहे. तसेच हा अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या व त्याला प्रवेश देणाऱ्या विद्यापीठांना यूजीसीने कडक इशारा दिला आहे. एम. फील. अभ्यासक्रमासाठी काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. एम.फील. ही मान्यताप्राप्त पदवी नाही. 2023-24 या शैक्षणिक वर्षात एम.फील. अभ्यासक्रमासाठी सुरू केलेली प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करावी, असे आदेश यूजीसीने विद्यापीठांना दिले आहेत. मात्र 2022 पर्यंतचे प्रवेश वैध असणार आहेत, असं देखील सांगण्यात आलं आहे. सध्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांचं काय, त्यांच्या नोकरीत फरक पडेल का? त्यांची पदवी ग्राह्य धरली जाईल का? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहेत. 

UGC ने विद्यापीठ अनुदान आयोग (पीएचडी पदवी पुरस्कारासाठी किमान मानके आणि प्रक्रिया) नियमावली, 2022 तयार केली आहे. जी 7 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय राजपत्रात प्रकाशित झाली आहे. 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी एम.फिल अभ्यासक्रमाचे प्रवेश बंद करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही विद्यापीठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी सूचना यूजीसीने दिली आहे. 

यूजीसी सचिव मनीष जोशी म्हणाले की, एम.फीलच्या प्रवेशासाठी काही विद्यापीठांनी नव्याने अर्ज मागवत असल्याचे निदर्शनास आले आहे. पण एम. फील ही कोणतीही मान्यताप्राप्त पदवी नाही,  हे लक्षात आणून द्यावे लागेल. यूजीसी विनियम 2022 चे नियम क्रमांक 14 स्पष्टपणे नमूद करते की उच्च शैक्षणिक संस्था एम.फिल ऑफर करणार नाहीत. 2023-24 साठी एम फील अभ्यासक्रामासाठी सुरु करण्यात आलेली प्रवेशप्रक्रिया तात्काळ बंद करावी. 2022 पर्यंतचे सर्व प्रवेश वैध आहेत. 

भारतामधील काही खासगी विद्यापीठांकडून 2023-24 वर्षांसाठी एम. फील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याच्या जाहीरातीही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचे निदर्शनास आलेय. पण पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पैसा आणि वेळही वाया जाईल.  मास्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात M.Phil ही पदवी मान्यताप्राप्त नाही. त्यामुळे कुणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ नये, असे यूजीसीकडून सांगण्यात आलेय. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
पायल झांबरे मृत्यू प्रकरण! घरातून 35 तोळे सोने, चांदीचे दागिने, मोबाईलसह सीसीटीव्ही फुटेज जप्त, पतीसह सासू सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ
Rajendra Pawar Ajit Pawar: 'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
'अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी', राजेंद्र पवारांनी अजितदादांसोबत घालवलेल्या लहानपणीच्या दिवाळीची अन् फटाक्यांची आठवण केली शेअर, म्हणाले, 'आठवण काढणे एवढेच मागे...'
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 
ट्रॉली बॅगच्या खास कप्प्यात गांजा लपवला, तरीही अधिकाऱ्यांनी शोधून काढला, पुणे विमानतळावर मोठी कारवाई, तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांचा गांजा जप्त 

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Embed widget