एक्स्प्लोर

पुणे: खालून होर्डिंग कापणाऱ्या दोघांना बेड्या

संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो.

पुणे: होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग आणि पांडुरंग वनारे अशी या दोघांची नावं आहेत. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे, तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डिंग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डिंग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती.होर्डिंग पडतेवेळी होर्डिंगखाली असलेली व्यक्ती उठून पळताना दिसते आहे. तो पांडुरंग वनारे आहे. होर्डिंग कोसळलं  पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. जुना बाजार चौकात रेल्वेच्या जागेमध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेली होर्डिंग्ज काढत असताना ही घटना घडली. रेल्वे प्रशासनाकडून हे होर्डिंग्ज काढण्याचं काम सुरु होतं. मात्र ते करताना होर्डिंग्जचे अँगल्स वरुन कापत येण्याऐवजी खालून कापले जात असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले. या चौकात पाच रस्ते एकत्र येतात. शनिवार वाडा, पुणे स्टेशन, आरटीओ कार्यालय, जिल्हा न्यायालय आणि मंगळावर पेठेतून येणारे रस्ते या चौकात एकत्र येतात. सरकारी खाबूगिरी जबाबदार पुण्यात होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना ही दुर्घटना नसून एक हत्याच आहे का? असा प्रश्न पडला आहे.  कारण या दुर्घटनेत झालेल्या 4 जणांच्या मृत्यूला सरकारी दिरंगाई आणि खाबूगिरी जबाबदार असल्याची धक्कादायक माहिती माझाच्या हाती लागली आहे. या होर्डिंगचं कंत्राट मिळालेल्या कंपनीनं करार संपल्यानंतर होर्डिंग काढण्याची परवानगी 5 महिन्यांपूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागितल्याचा दावा केला आहे. पण त्यानंतरही परवानगी न दिल्यानं हे काम रखडलं होतं. काही दिवसांपूर्वी हे काम सुरु झालं. पण त्यावेळी कर्मचाऱ्यांनी या होर्डिंगला आधार देण्यासाठी लागणारे अँगल कापून काढून ठेवल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतरही या होर्डिंगवर राजकीय फलकबाजी सुरुच राहिली. त्यामुळे आता या लेट-लतिफीला आणि त्यामुळे झालेल्या अपघाताला आणि त्यात गेलेल्या 4 जणांच्या मृत्यूला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचं दिसतंय. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तसंच जखमींना 1 लाखाची मदत रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. पत्नीच्या अस्थी विसर्जनानंतर पतीचा मृत्यू या अपघातात शिवाजी परदेशी या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. दुर्देव म्हणजे शिवाजी यांच्या पत्नीचं परवा निधन झालं, काल ते आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी निघाले होते, त्याचवेळी जुना बाजार परिसरात त्यांच्या रिक्षावर होर्डिंग कोसळले आणि शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. अस्थी विसर्जनाला जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर्थ, 17 वर्षांची मुलगी समृद्धी आणि आईदेखील होती. अस्थी विसर्जनासाठी परदेशी कुटुंबीय आळंदीला गेले होते. मात्र परतीच्या प्रवासावेळी हे होर्डिंग्स त्यांच्या रिक्षेवर कोसळले आणि होत्याचं नव्हतं झालं. रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे अवघ्या 48 तासांत मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचं छत्र हरपलं. संबंधित बातम्या  पुणे: खालून होर्डिंग कापणाऱ्या दोघांना बेड्या   पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन परतताना पुण्यात रिक्षाचालकाचाही मृत्यू   पुणे होर्डिंग दुर्घटनेला सरकारी दिरंगाई आणि खाबूगिरी जबाबदार  

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget