एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रक आणि क्रेनचा अपघात

पिंपरी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ अपघात झाला आहे. ट्रक आणि क्रेनच्या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला आहे. एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातामुळं मुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली आहे. महामार्गावर 2 किलोमीटरहून अधिकच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान वीकएन्डनिमित्तानं एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या अपघातामुळे गैरसोय झाली आहे. अपघातानंतर तातडीनं महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा





















