पुणे : प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची सध्या राज्यभरात चर्चा चालू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून थेट वाशीमला बदली करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी असूनही त्यांचा शाही थाट समोर आला आहे. त्या वापरत असलेल्या एका ऑडी कारचीही चांगलीच चर्चा चालू आहे. हीच ऑडी कार आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 


पुणे पोलिसांनी कार घेतली ताब्यात, पाठवली होती नोटीस


मिळालेल्या ताज्या माहितीनुसार वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलीसांनी  ताब्यात घेतली आहे. चतुःश्रृंगी वाहतूक विभागाच्या पोलीस ठाण्याला बॅरिकेटिंग करून ही ऑडी कार ताब्यात घेण्यात आली आहे. पूजा खेडकर यांनी याच ऑडी कारला अंबर दिव्यासह महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावला होता. पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांनी कारसह कारची कागदपत्रे तपासण्यासाठी हजर राहावे अशी नोटीस बजावली होती. तसेच हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली आहे.पूजा खेडकर  दोन दिवसांपूर्वी याऑडी कारचा 27600 रुपये दंड भरला आहे.


पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार त्यांच्या कारचालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात नेऊन जमा केली आहे. या कारवर लाल दिवा लावून पूजा खेडकर त्या आयएएस अधिकारी असल्याचं दाखवत होत्या. अनेक सरकारी कार्यालयांत जाताना त्यांनी ही कार वापरली होती. मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश दिला नव्हता. मात्र काल रात्री त्यांच्या ड्रायव्हरने गाडी पोलीसांकडे सोपवली आहे. या गाडीची कागदपत्रे पोलिसांकडे सोपविण्यात आलेली नाहीत असं पोलिसांच म्हणणं आहे.


पूजा खेडकर यांचा 'कार'नामा


शासकीय नियमानुसार खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन अशा नावाची पाटी लावणे अयोग्य आहे. पण पूजा खेडकर यांच्या या आलिशान ऑडी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली होती. खेडकर या 2022 सालच्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांच्या या ऑडी कारला व्हिआयपी नंबर आहे.  शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा लावण्यात आलेला आहे. हीच गाडी घेऊन पूजा खेडकर पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यायच्या. त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांच्या या ऑडी कारची सगळीकडे चर्चा होती. 


हेही वाचा :


IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन समोर; दिव्यांग प्रमाणपत्र देणारे रुग्णालय नगरचं, अभिलेख तपासणीत बाब समोर


Pooja Khedkar: ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट, वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावून स्वत:चं कार्यालय थाटणाऱ्या पूजा खेडकर कोण?


IAS Pooja Khedkar: 'दिव्यांग व्यक्ती कार चालवणं तर दूरचं पण...', पूजा खेडकर दोषी आढळल्यास कारवाई करावी, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी