एक्स्प्लोर

Pune Ganesh Jayanti Traffic diversion: गणेश जयंती निमित्त उद्या दगडूशेठ गणपतीला जाताय? शिवाजी रस्ता बंद; हे असतील पर्यायी मार्ग...

Ganesh Jayanti 2023: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते त्यामुळे शिवाजी रस्ता बंद करण्यात येणार आहे.

Pune Ganesh Jayanti Road diversion : माघी श्रीगणेश जयंतीच्या (dagdushet ganpati mandir) पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता 25 जानेवारी रोजी सकाळी 6वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अग्निशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे. 

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग कसे असतील-

-या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी  प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील.

-स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.

स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी कोणते मार्ग?

-ही वाहने  स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील. 

-जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. 

-शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.  शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.

-अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत असून ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील. 

-बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

-त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP MajhaDombivli Boiler Blast Special Report : डोंबिवलीत मृत्यूचे कारखाने...आजपर्यंत किती स्फोट झाले?Pune Accident Rap Video : 'तो' व्हिडीओ माझ्या लेकाचा नाही, विशाल अग्रवालची पत्नी ढसाढसा रडली!Maharashtra Boat Accident Special Report : तीन दिवसात 18 जणांचा बुडून मृत्यू! महाराष्ट्र हादरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोप आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Embed widget