पुणे: पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढेंना धमकावल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक आबा बागूल यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
काही समस्यांचं निवारण करण्यासाठी आबा बागूल हे तुकाराम मुंढेच्या भेटीला गेले होते. मात्र यावेळी बागूल आणि तुकारम मुंढे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
त्यावेळी बागुल यांनी पीएमपीएमएल विरोधात आंदोलन करण्याचा आणि बसेस अडवण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक आबा बागूल यांनी तुकाराम मुंढेंना धमकावलं अशी तक्रार मुंढेंच्या सुरक्षारक्षकानं दिली.