एक्स्प्लोर

शिक्षकाकडून मुलींसोबत लैंगिक चाळे, मुख्याध्यापकासह चौघांवर गुन्हा

एक दोन नव्हे तर सहा ते सात मुलींसोबत या शिक्षकाने लैंगिक चाळे केल्याची माहिती आहे. या शिक्षकासोबतच मुख्याध्यापक आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. आता तर थेट गुरुनेच शिष्येवर अत्याचार केलाय. एक दोन नव्हे तर सहा ते सात मुलीचं लैंगिक शोषण या नराधम शिक्षकाने केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरु होता. पीडित मुलींनी याची तक्रार करूनही मुख्याध्यापकांनी प्रकरण दडपलं होतं. या शिक्षकाचं बालाजी डोंबे असं नाव आहे. शिक्षक आणि मुख्याध्यापकासह अन्य दोन शिक्षकांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. या चार शिक्षकांचं शाळेकडून निलंबन करण्यात आलं आहे. घटनेची माहिती असूनही त्याची तक्रार न केल्यामुळे मुख्याध्यापक आणि इतर दोन शिक्षकांना आरोपी करण्यात आलं आहे. डोंबे विद्यार्थिनींना शाळेतील एका खोलीत आणि घरी बोलावून असे चाळे करत होता. तसेच मुलींना अश्लील चित्रफित दाखवण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. 1 ऑक्टोबरला काही मुलींनी एकत्रित येऊन याची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली, पण त्यांनी यावर पडदा टाकला. अखेर प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचलं आणि या शाळेतील शिक्षकांचं बिंग फुटलं. वरिष्ठ पातळीवर चौकशी केल्यानंतर आरोपी शिक्षकाला छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महिला सुरक्षित आहेत का? पिंपरी चिंचवडसाठी 15 ऑगस्टपासून स्वतंत्र आयुक्तालयाच्या कामकाजाची सुरुवात झाली. स्वतंत्र आयुक्तालय असूनही बलात्कार, विनयभंग आणि छेडछाडीच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. 9 सप्टेंबर रोजी आयटी अभियंता तरुणीचा हॉस्टेलमध्ये विनयभंग झाला. हिंजवडी पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी तरुणीलाच धमकावलं. या तरुणीने वकिलामार्फत थेट पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि मग पोलिसांनी हालचाल केली. 16 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराची घटना समोर आली. यातील एका मुलीचा मृत्यू झाला. 24 सप्टेंबर रोजी पिंपरीतून सात वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याचं समोर आलं. तीन दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह आढळला. 2 ऑक्टोबर रोजी चार वर्षीय चिमुकलीवर तडीपार गुन्हेगाराकडून बलात्कार करण्यात आला. 2 ऑक्टोबर रोजीच चिंचवडमध्ये सहा वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget