एक्स्प्लोर

कलमाडींनी आयओएचं आजीवन अध्यक्षपद नाकारलं

पुणे : माजी खासदार सुरेश कलमाडींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीवन अध्यक्षपद नाकारलं आहे. कालच त्यांची आयओएच्या मानद आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आज आयओएला पत्र लिहून आपण हे पद स्वीकारु शकत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रकूल घोटाळ्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलेले आयओएचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी, यांची आयओएच्या मानद आजीव अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. काल चेन्नईत झालेल्या आयओएच्या वार्षिक सभेत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तींची आयओएमध्ये एखाद्या मानाच्या पदावर निवड केली जाते, याविषयी क्रीडाक्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. आयओएच्या कारभारावरही त्यामुळं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. मात्र आज कलमाडींनी आयओएला पत्र लिहून दिलेल्या बहुमानासाठी आभारही मानले आहेत. काल कलमाडींची नियुक्ती झाल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कलमाडींच्या नियुक्तीची लगेचच दखल घेत या प्रकरणी अहवाल मागितला होता, तसंच कारवाईचेही संकेतही दिले होते. सुरेश कलमाडी सध्या 72 वर्षांचे आहेत. कलमाडी यांनी 1996 ते 2011 या कालावधीत भारतीय ऑलिम्पिक संघटना अर्थात आयओएचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचार समोर आला. त्यानंतर कलमाडींना आयओएचं अध्यक्षपद सोडावं लागलं होतं. कलमाडींना या प्रकरणी अटक झाली होती आणि दहा महिने तुरुंगात काढल्यावर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. कलमाडी हे 2000 ते 2013 या कालावधीत आशियाई अॅथलेटिक्स संघटनेचेही अध्यक्ष होते. या संघटनेनं त्यांना गेल्या वर्षीच मानद अध्यक्षपद दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget