एक्स्प्लोर

Supriya Sule : राष्ट्रवादीत फूट, यंदा पवारांची यंदाची दिवाळी कशी साजरी होणार?, क्षणाचाही विलंब न करता सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या...

पवारांची दिवाळी काल एकत्र होती आजही आहे आणि उद्याही एकत्र होईल, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी कुटुंब एकत्र असल्याचं बोलून दाखवलं आहे.

पुणे : राष्ट्रावदीत फुट पडल्यापासून पवार कुटुंबियांमध्येही (Supriya Sule) फूट पडली आहे का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यातील विविध विषयांवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अनेकदा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये शाब्दित वादावादी बघायला मिळाली. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आता पवार कुटुंबियांचं काय होणार? त्यांचे सण कसे साजरे होतील. या सगळ्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळेंनी पूर्णविराम दिला आहे. पवारांची दिवाळी काल एकत्र होती आजही आहे आणि उद्याही एकत्र होईल, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी कुटुंब एकत्र असल्याचं बोलून दाखवलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील माळावरच्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळेनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकीय मतभेद आमचे जरूर झालेत जेव्हा राजकीय लढाया असेल त्यावेळेस आम्ही संपूर्ण ताकतीने लढू परंतु कुटुंब जबाबदारी काही असते की नाही. त्यामुळे कुटुंबातील जबाबदारी नीट पार पाडू. पवारांची दिवाळी काल एकत्र होती आजही आहे आणि उद्याही एकत्र होईल. 

देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी घरात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो तेदेखील सांगितलं आहे. शारदाबाई पवार आणि माझी आई या नऊ दिवसाच्या उपवास करतात.आजही माझी आई नवरात्राचा उपास करते. त्यांची या देवीवर श्रद्धा आहे त्याच्यामुळे मी आज या ठिकाणी दर्शन घेतल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणती फुट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत.आमच्यातले काही सहकारी वेगळ्या विचाराच्या पक्षासोबत काम करतात. ही आमची कायदेशीर लढाई आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

येत्या (22 ऑक्टोबर) रविवारी अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन शरद पवार करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यावर सुप्रिया सुळे यांना विचारल्यास त्या म्हणाल्या की, विद्या प्रतिष्ठान एक संस्था आहे. त्याची स्थापना पवार साहेबांनी केली. विद्या प्रतिष्ठान एक सामाजिक जबाबदारी आहे आणि आमच्या कुटुंबातील सगळी लोकं ही सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. हा राजकीय विषय नाही तर सामाजिक विषय असल्याने कृपया गल्लत करू नये, असं त्यांनी खडसावलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Lalit Patil drug Case : ललितला 2020 मध्ये अटक, मात्र ठाकरेंनी त्याला प्रमुख केलं, त्याची चौकशी का नाही केली?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget