पुणे : पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटींचे ड्रेस जप्त करण्यात आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांच्या कारवाईच कौतुक करत 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केलं आहे. आज ते पुण्यामध्ये बोल होते. यावेळी बोलताना त्यांनी ड्रग्ज कारवाईवर भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही मोठी कारवाई केली आहे. नजीकच्या काळातील ही देशामधील सगळ्यात मोठी कारवाई आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मोहीम राबवत आहोत. ड्रग्ज संदर्भात झिरो टॉलरन्स अवलंबला जात आहे. ड्रग्ज समाजाला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे. जे काम बंदूक आणि मिसाइल करू शकत नाही ते काम ड्रग्ज करत आहे म्हणून हे नष्ट करायचं असल्याचं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
तर किती घरे उद्ध्वस्त झाली असती
त्यांनी पुढे सांगितले की, हा साठा जर पोहोचला असता, तर किती घरे उद्ध्वस्त झाली असती. कारखाने टाकून एमडी ड्रग्ज बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून पैशांची देवाण-घेवाण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ही जी कारवाई झाली ती महत्त्वाची आहे. आपल्या समोर काय आव्हान आहेत ते लक्षात घेऊन आपल्याला काम करावे लागेल. या कारवाईमधून खूप काही शिकवलं आहे. आता अशाच लिंक शोधा असे आवाहन त्यांनी पुणे पोलिसांना केले. याचे रुट शोधणे महत्त्वाचं असल्याचे फडणवीस म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सगळ्या राज्यांना एकत्रित सूचना दिल्या आहेत आणि मदत करण्याचं आवाहन केलं आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
फडणवीस यांनी स्वदेशी शस्त्रांची पाहणी केली
दरम्यान, डिफेन्स एक्स्पोच्या उद्धाटनादरम्यान फडणवीस यांनी स्वदेशी शस्त्रांची पाहणी केली. स्वतः स्वदेशी रायफल हातात घेऊन पाहणी करत त्यांनी नेम साधला. पुण्यातडिफेन्स एक्स्पो आजपासून सुरू झालं आहे. स्वदेशी संरक्षण क्षेत्रातील लढाऊ साहित्य पाहण्यासाठी भेटणार आहे. अत्याधुनिक शस्त्रांसह रणगाडे, हेलिकॉप्टर, मिसाईल, तोफा, पाणबुडीचा समावेश आहे. राज्य सरकारच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (Mega defence expo) क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे' आयोजन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या