Sharad Pawar on PM Modi : देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडेही सरकार ढुंकून बघत नाही. शेतात वाढलेलं तण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. पुण्यात (Pune) महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. 


माईक हातात मिळताच नेहरूंवर टीका करतात; शरद पवारांचा पीएम मोदींवर घणाघात


शरद पवार म्हणाले, या देशाला दिशा देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्याबद्दल घृणा पसरवण्याचा प्रयत्न मोदी (PM Narendra Modi) करत आहेत. जवाहरलाल नेहरू यांनी देशात संसदीय लोकशाही मजबूत केली, जगात देशाची प्रतिष्ठा वाढवली, संपूर्ण जग हे मान्य करत आहे. पण मोदी मान्य करत नाहीत. माईक हातात मिळाला की नेहरुंवर टीका करतात, असा घणाघातही शरद पवारांनी केला. 



'देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही'


पुढे बोलताना शरद पवार (Sharad Pawar)  म्हणाले,  ज्याप्रमाणे शेतात वाढलेलं तन आपण उपटून फेकतो तसं हे सरकार उखडून टाकावं लागेल.देशात रोज 60 ते 65 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, पण हे सरकार ढुंकून बघत नाही. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांच्याकडे सरकार ढुंकून बघत नाही.


'राज्यांबद्दल मोदी सरकारची भूमिका असहकार्याची आहे'


संविधानावर आधारित लोकशाही विषयीची चिंता मागील 10 वर्षांत वाटू लागली आहे. राज्यांबद्दल मोदी सरकारची भूमिका असहकार्याची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत भ्रष्टाचार केला असा आरोप केंद्र सरकारने केला. त्यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणून कारवाई करावी, असं माझं आव्हान आहे, असेही शरद पवार (Sharad Pawar)  यावेळी बोलताना म्हणाले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


Ajay Baraskar : मनोज जरांगेंसोबत कोअर कमिटीमध्ये होता, तर देहूहुन तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो का म्हणता? अजय बारसकरांनी थेट उत्तर टाळले!