पुणे : बारामती लोकसभेची निवडणूक (Baramati Loksbha Election) ही नणंद भावयजाचा कौटुंबिक कार्यक्रम नाही, सरपंचपदापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणूक सिरिअसली घेतली पाहिजे असं वक्तव्य करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपण निवडणुकीसाठी तयार असल्याचं सांगितलं. कुणीही उमेदवार असो, बारामतीच्या प्रश्नावर मी कुणाशीही चर्चा करायला तयार आहे असंही त्या म्हणाल्या. मी राजकारणात फसवणूक केली असं हर्षवर्धन पाटील म्हणूच शकणार नाहीत असं म्हणत त्यांनी अजित पवारांनाही टोला लगावला. सुप्रिया सुळे इंदापुरात बोलत होत्या. 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "नणंद भावजय असं तुम्ही बघता, पण हा कौटुंबिक कार्यक्रम नाही. माझी लढाई वैचारिक आहे. माझ्या विरोधात कुणीही उभा राहिलं तरीही त्याच्यासोबत ते म्हणतील ती जागा आणि म्हणतील ती वेळ, त्यावर चर्चा करायला तयार आहे. कोण माझ्याविरोधात उभा राहील माहीत नाही.  मी तीन निवडणूक लढले. भाषण करायला तुम्ही मला निवडून पाठवले आहे. मी अनेक लोकांची संसदेतील भाषणे ऐकते. सरपंचपासून लोकसभेपर्यत प्रत्येक इलेक्शन सिरियसली घेतले पाहिजे."


काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? 


200 आमदारांचे सरकार, पण शेतकऱ्यांसाठी वेळ नाही


नेहमी दौरा करतो आहे तसाच आजचा दौरा आहे. राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती होईल. सरकारला या आधीच सांगत होते की काहीतरी उपाययोजना करा. आता काही ठिकाणी दुष्काळ जाहीर केला. सध्या अडचणींचा काळ आहे. 200 आमदारांचे सरकार आहे पण या शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. 


ड्रग्जबद्दल अनेकदा मी बोलले आहे. ललित पाटील घटना झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं होतं की ड्रग्जच्या बाबतीत राजकारण नको. ड्रग्जच्या बाबतीत जर सरकार काही करणार असेल तर आम्ही ताकदीने उभा राहू. 


भाजपमध्ये संघर्ष करणारे सतरंज्या उचलत आहेत


ओरिजिनल पेक्षा इन्कामिंगला भाजप जास्त महत्त्व देत आहे. ज्या मुंडे साहेबांनी भाजपसाठी संघर्ष केला त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी वेळ नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना मंत्री केलं. काश्मीर ते कन्याकुमारी हाच प्रश्न आहे. जावडेकर, माधव भंडारी यांनी संघर्ष केला, त्यांना पक्षाने काय दिले? ज्यांच्यावर आरोप केलं ते चांदीच्या ताटात जेवत आहेत आणि संघर्ष ज्यांनी केला ते सतरंज्या उचलत आहेत. 


मी फसवणूक केली असं हर्षवर्धन पाटील म्हणू शकणार नाहीत 


अंकिता पाटील यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. त्यांचा तो महायुतीचा प्रश्न आहे. काही नाती ही राजकारण पलीकडे असतात. आमचे राजकीय मतभेद असले तरी मनभेद होऊ देत नाही. ज्यांनी मला मदत केली ते मी विसरू शकत नाही. मी फसवणूक केली असं हर्षवर्धन पाटील माझ्याबद्दल असं बोलू शकत नाही. 


माझे लोकशाहीवर प्रचंड प्रेम आहे. माझ्यासाठी संसद हे मंदिर आहे. मोदी देखील संसदेच्या पायरीवर नतमस्तक झाले. 


जल जीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार


काल मी दौंडला होते, माझी मागणी आहे की जल जीवन मिशनचे ऑडिट केलं पाहिजे.  कामाचा दर्जा नाही, वेळेवर काम नाही, हर घर जल ही यंत्रणा होती तशी झाली नाही. जल जीवन मिशनचा सरकारने व्हाईट पेपर काढावा. शेती आणि आरोग्य खाते काम करत नसेल तर त्याची माहिती पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालेन. शेती आणि आरोग्य खाते काम करत नसेल तर त्याची माहिती पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या कानावर घालेन. 


1967 साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून आजपर्यंत साथ देत आहेत. शरद पवार देशातील सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा नेता आहे. मोदी म्हणतात की शरद पवार शेतकऱ्यांचा नेता आहे. 


आरक्षणच्या बाबतीत जी सरकारची भूमिका आहे ती फसवी आहे. सरकार काहीही निर्णय घेऊ शकते, पण हे सरकार आरक्षणाचा निर्णय का घेत नाही? सरकारच्या जुमलेबाजीची आम्हाला सवय झाली आहे


मोदी सरकारने व्हाईट पेपर काढला, काँग्रेसने ब्लॅक पेपर काढला. मोदींनी किती घोषणा केल्या आणि स्कीम किती आणल्या याची माहिती त्यामध्ये देण्यात आली. 


अनेकदा मी पाण्याच्या प्रदूषण वर बोलले आहे. आपण सगळ्यांनी मिळून देशात एक उपक्रम राबवायला पाहिजे. 


महानंद ही संस्था उभी करणे मोठे असते, पण लाटणे सोपं आहे. अदृश्य शक्तीला ती गुजरातला न्यावेसं वाटलं असेल. महाराष्ट्राचे अस्तित्व कमी करण्याचे काम केंद्र सरकार करते आहे. 


ही बातमी वाचा :