पुणे : पुण्यातील गोयल गंगा कंपनीच्या गंगा भाग्योदय प्रकल्पाविरोधात सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 100 कोटी रुपये किंवा प्रकल्पाची एकूण किंमत यापैकी जी जास्त असेल ती दंड स्वरुपात भरण्याचा आदेश दिला आहे.

गोयल गंगा कंपनीच्या पुण्यातील सिंहगड रोडवरच्या गंगा भाग्योदय या प्रकल्पासंबंधित हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पर्यावरणाच्या नियमांची उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीला 100 कोटी रुपये किंवा या प्रकल्पाची एकूण किंमतीच्या 10 टक्के रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड स्वरूप भरण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान या कंपनीच्या 2 इमारतींच्या बांधकामावर कोर्टाने स्थगिती आणली आहे. पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला हा मोठा धक्का मानला जात आहे.