एक्स्प्लोर
खंडाळा घाटात अमृतांजन पुलावरुन पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
पिंपरी चिंचवड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाढती अपघातांची संख्या हे काळजीचं कारण ठरलं असतानाच आणखी एक अपघाती मृत्यू समोर आला आहे. अमृतांजन पुलावरुन पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
खंडाळा घाटातल्या अमृतांजन पुलावरुन खाली पडून 20 वर्षीय विद्यार्थी मृत्युमुखी पडला. तनवेल कदम असं या त्याचं नाव असून तो मूळ मालेगावचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलिस अधिक तपास करत असून त्यानंतरच या अपघाताचं कारण समजू शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement