Teachers Day Special : ग्रामीण शिक्षणासाठी असलेल्या (Education) अडचणी जाणत त्यावर मार्ग काढत साताऱ्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव (Balaji jadhav) यांनी ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. साताऱ्यातील विजयनगर या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत 31 विद्यार्थी आहेत आणि बालाजी जाधव एकटेच शिक्षक आहेत. शाळेतील मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी ते तत्पर असतात.विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच अजून कोणती कौशल्ये शिकवता? असा प्रश्न त्यांना एका आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या वेळी विचारण्यात आला होता. त्याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी शोधलं आणि वीटभट्टी आणि मेंढपाळांच्या वस्तीत राहणाऱ्या मुलांना शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य शिकवण्यासााठी शाळेत उपाययोजन आखली. त्यामुळे वीटभट्टी आणि मेंढपाळांच्या वस्तीत बांधलेली शाळा जगातील 40 देशांशी जोडली गेली. 


बाहेर देशातील शाळांशी संपर्क करुन त्यांनी ऑनलाईन कौशल्य शिकवण्याची मागणी केली. त्यानुसार त्या शाळांंच्या मार्फत बालाजी यांच्या शाळेतील मुलं कौशल्य शिकू लागली. या योजनेमुळे एकेकाळी शिक्षणापासून वंचित असणारी विद्यार्थी आता जपान, अमेरिका, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड या देशांतील शाळकरीविद्यार्थ्यांकडून कौशल्ये शिकत आहेत. इथली मुलं कॉम्प्युटरवर कोडिंग करतात, अॅप्स बनवतात, ऑनलाइन ग्रुप स्टडी करतात. एवढेच नाही तर खेळण्याच्या वयात ही मुले घरातील साबण आणि हर्बल पदार्थ बनवत आहेत आणि ठिकठिकाणी प्रदर्शने लावून त्याचे मार्केटिंग करतात. खरंतर या सगळ्यामागे 36 वर्षीय बालाजी जाधव यांची मेहनत आहे. यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 70 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.


शाळेची प्रगती पाहून या शाळेत  अनेक विद्यार्थ्यांना आता प्रवेश घ्यायचा असतो. सुरुवातीला बालाजी यांनी 31 विद्यार्थ्यांना सोबत घेत विविध कौशल्य शिकवण्याची सुरुवात केली. त्यातून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राची माहिती आणि कौशल्य शिकता आले. आता विद्यार्थांनी ही कौशल्य आत्मसात करुन घेत त्याचं प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी सगळ्या गावात एक आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखले जाऊ लागले. आता या शाळेत प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी आणि पालक आतूर असतात. 


10 वर्षांपुर्वी मिळाली होती ऑनलाइन शिक्षणाची माहिती
10 वर्षांपुर्वी सातारा येथील पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका कार्यक्रमात मला प्रथमच ऑनलाइन शिक्षणाची माहिती मिळाली. तेव्हा माझा स्वतःचा ईमेल आयडीही नव्हता. बटण असलेला फोन होता. त्यानंतर मी स्मार्टफोन विकत घेतला आणि गुगलवर शिक्षणाबद्दल सर्च करू लागलो. इंटरनेटशी जोडलेल्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये जायला सुरुवात केली. काही वर्षांनी मी Google प्रमाणित शिक्षक झालो, असं ते सांगतात.


शाळेतील पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न
माझे लक्ष शाळेतील पायाभूत सुविधा सुधारण्यावर होते. मी सीएसआर फंडासाठी अर्ज केला. माझ्या कामामुळे मला लवकरच अनुदान मिळाले. यानंतर शाळेत कॉम्प्युटर लॅब बांधली, टॅब बसवले, ई-लायब्ररी विकसित झाली. या बदलाचा परिणाम असा झाला की आमची मुले राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवू लागली आहेत, असंही ते अभिमानाने सांगतात


40 देशांतील शाळा एका क्लिकवर
मोठ्या हायटेक शाळांमध्येही अशी सुविधा नसेल तशी सुविधा या शाळेत आणली. कॉपी-बुक प्रमाणे इथल्या प्रत्येक मुलाकडे एक टॅब आहे. 40 देशांतील शाळा आमच्या प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत. आमची मुलं त्यांना त्यांचे कौशल्य शिकवतात आणि तिथली मुलं आमच्या मुलांना शिकवतात. अशा प्रकारे आम्ही एकमेकांशी कल्पना आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतो. त्यामुळे मुलांचे ज्ञान वाढते. भारताबाहेरील मोठ्या देशांतील मुले काय आणि कसे शिकत आहेत, याची माहिती त्यांना मिळते.एवढेच नाही तर भारतातील 25 हून अधिक राज्यांमध्ये आमची मुले इतर मुलांना त्यांचे कौशल्य शिकवत आहेत, असं ते अभिमानाने सांगतात.


कोविडमध्ये कॉन्फरन्स कॉलद्वारे मुलांना शिकवायला सुरुवात केली
लॉकडाऊन लागू झाल्यावर आमच्या मुलांचे शिक्षण ठप्प झाले. बहुतेक मुलांकडे स्मार्टफोन नव्हता, त्यांना ऑनलाइन वाचता येत नव्हते. यानंतर मी एक नवीन कल्पना सुचली आणि कॉन्फरन्स कॉलद्वारे मुलांना शिकवायला सुरुवात केली. कॉलवर 10 मुलांना एकत्र जोडणे आणि त्यांना कथेद्वारे शिकवणे. मग मुलांना कॉपीवर लिहायला सांगा. कॉपीवर लिहून झाल्यावर ते मला परत सांगायचे. इतकेच नाही तर मुले ते रेकॉर्डही करत असत, जेणेकरून नंतर ते पुन्हा वाचू शकतील.हे मॉडेल इतके लोकप्रिय झाले की अनेक देशांनी ते स्वीकारण्यास सुरुवात केली. कारण या मॉडेलमुळे मुलांना चॅप्टर सहज आठवत होते आणि त्यांचा वेळही वाया जात नव्हता.