एक्स्प्लोर

Pune : सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले.

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विधान  परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, 'महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून आपण पुढे नेले पाहिजे.' सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता असेही श्री. कोश्यारी म्हणाले. सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले. 

सावित्रीबाई फुले यांच्या नावाला साजेसे अभ्यासक्रम राबवा - मुख्यमंत्री  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शवली होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या.  विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल.  

महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन 3 कोटी देणार : उदय सामंत 
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी तीन कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
सावधान! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र, 3 ते 7 जुलै दरम्यान महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
Pune Nasrapur Case: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget