एक्स्प्लोर
Advertisement
पुण्यातील बुधवार पेठेत स्टेज कोसळून अनेक गोविंदा जखमी
गोविंदा पथकाला बक्षीसाची ट्रॉफी आणि रक्कम दिली जात होती, त्याचवेळी हे स्टेज कोसळल्याने, गोविंदा पथकही कोसळलं.
पुणे: दहीहंडीच्या थरारादरम्यान बुधवार पेठेत स्टेज कोसळून 14 ते 15 जण जखमी झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी व्यासपीठ कोसळून मंडळाचे 14 ते 15 कार्यकर्ते जखमी झाले. त्यापैकी 4 ते 5 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर आल्याने हे स्टेज कोसळलं. मोठ्या धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव सुरु होता. त्यावेळी मनोरा रचून बक्षीस घेण्यासाठी एक गोविंदा पथक मंचावर आलं. मात्र स्टेज छोटं असूनही अनेक लोक मंचावर आल्याने, ते स्टेज कोलमडून पडलं. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने स्टेज एका क्षणात कोसळलं. हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.
गोविंदा पथकाला बक्षीसाची ट्रॉफी आणि रक्कम दिली जात होती, त्याचवेळी हे स्टेज कोसळल्याने, गोविंदा पथकही कोसळलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement