पुणे : पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडी जवळ एसटी बस, ट्रक आणि मारुती काराचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच ते सहाजण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातामुळे कात्रज बोगद्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.


पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडीजवळ आज एसटी बस, ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच ते सहाजण जखमी झाले असून, जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान, पुणे-सातारा रोडवरील शिंदेवाडीजवळ पुल बांधकामाचे काम रखडल्याने अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

विशेष म्हणजे, पारगाव खंडाळ्याजवळील घाटातील रस्त्याची रचना चुकल्यामुळे महामार्ग पोलिसांनी रिलायंसच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद केला होता. मात्र तरीही अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही.

त्यामुळे नितीन गडकरींनीही आज पुण्यातील एका पुलाच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमात बोलताना, रस्त्यांच्या रखडलेल्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. रखडलेल काम म्हणजे काळा डाग असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

आपलं शहर नियोजन फुकटाला महाग, गडकरींची मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर टीका