एक्स्प्लोर

Ajit Pawar: मावळमध्ये अजित पवार गटात फूट? बापू भेगडेंनी महामंडळ नाकारलं, विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम, शेळकेंची अडचण वाढली?

Ajit Pawar: मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे.

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. त्यामुळे आता मावळ विधानसभा मतदारसंघात देखील उमेदवारीवरून रस्सीखेच पहायला मिळत आहे. सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्येच रस्सीखेच असल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांची पक्षाकडून राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या पदाची मागणी केली नाही त्यामुळे हे पद नको. तर मावळ विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी मागितली असून पक्षाने माझी उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका बापू भेगडे यांनी घेतली आहे. पत्रकार परिषद घेत बापू भेगडे यांनी ही भूमिका मांडली. परंतु यामुळे आता विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली असून उमेदवारीला अजित पवार गटातूनच विरोध असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

काय म्हणालेत बापू भेगडे?

काल राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची किंवा कोणतीही पदाची मी मागणी केली नाही. मी आग्रह धरला विधानसभेचा. त्याचाही निर्णय आतापर्यंत झालेला नाही. मी पक्षाकडे विधानसभेची मागणी केली आहे. आम्ही अजित पवारांना भेटलो. त्यावेळी एक गोष्ट निदर्शनास आली. अजित पवार म्हणाले, तुमच्या दोघांची नावे आहेत, त्यांचा आम्ही विचार करू. त्यांनी विचार करू म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र, मला राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याची बातमी समजली. ज्या कार्यकर्त्यांनी मागितली आहे, त्यांना ते दिलं गेलं पाहिजे. कारण, मी एका पदावर आहे, आणि मी ज्या पदाची मागणी केली,त्याचा अद्याप निकाल आला नाही. मला खात्री आहे, मला उमेदवारी मिळणार आहे, जर काही निर्णय बदलला गेला, तर आम्ही कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्याबाबत निर्णय घेऊ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदापेक्षा मी मोठ्या पदावर काम करतो आहे. मी ज्या पदाची मागणी केली आहे, ते मिळावं अशी मागणी आहे, असंही यावेळी बोलताना बापू भेगडे यांनी म्हटलं आहे.

मावळसाठी एकाच पक्षातील दोन नेते इच्छुक

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आता लवकरात लवकर पक्षांचं जागावाटप आणि उमेदवार निवडी पार पडतील. सगळ्या पक्षांकडून जागावाटप ठरून उमेदवारांची नावं घोषित केली जाणार असल्याची चर्चा असतानाच आता पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तसे संकेत आता दिसू लागले आहेत. 

मावळमध्ये अजित पवार गटाचे नेते बापू भेगडे यांनी महामंडळाचं पद नाकारलं असून विधानसभा निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. याबद्दल अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्याचं चित्र दिसून येत आहे.

 

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kho Kho Association : खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
खो-खो असोसिएशनचे कामकाज होणार पेपरलेस, सुनेत्रा पवारांच्या हस्ते 23 जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉपचे वाटप
Pune Rada : राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले, सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात काँग्रेस- ABVP कार्यकर्ते भिडले, सीओईपी कॉलेजवर मोठा राडा
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
गद्दारांना कोणताही युक्तिवाद नसतो, तो फुटीर गट, शिवसेना पक्ष सुनावणीवरुन राऊतांचा जोरदार प्रहार 
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget