पुणे : पुण्यात एकीकडे ससून  ड्रग्ज प्रकरण सुरु (Pune Crime News)  असतानाच कस्टम विभागाने पुणे रेल्वे स्टेशनवर मोठी कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्थानकावरुन 90 किलो गांजा जप्त केला आहे. या गांजाची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे. कोणार्क एक्सप्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याच एक्सप्रेसमधून हा गांजा जप्त करण्यात आला आहे. 


ओडीसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी सुरु असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पुणे कस्टम विभागाकडून दोन आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. या एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी सुरु असल्याची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. त्यांनी पुणे स्टेशनवर सापळा रचला होता. त्यानुसार कोणार्क एक्सप्रेस पुण्यात दाखल होताच  कस्टम विभागाने धडाधड कारवाईला सुरुवात केली. यात तब्बल 27 लाख रुपयांचा गांजा जप्त केला. 


तस्करांवर कस्टम विभागाची करडी नजर


सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि जांगाची तस्करी होत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर आलं आहे. त्यात आतापर्यंत लाखो रुपयांचा गांजा पुणे शहरात जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलीस,रेल्वे पोलीस आणि कस्टम या विभागांची यांची तस्करांवर करडी नजर असल्याचं कारवायांमधून दिसून येत आहे. 


पुणे विमानतळ सोने तस्करीचा अड्डा?


काहीच दिवसांपूर्वी दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या  एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले होते. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या होत्या त्यामुळे य़ा महिलेची कसून तपासणी करण्यात आली होती. 


मागील काही दिवसांपासून कस्टम विभागाने धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाने संयुक्त कारवाई करतात.


इतर महत्वाची बातमी-


Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघात, फडणवीसांकडून शोक; जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार