एक्स्प्लोर

Pune News: सकाळी नेहमीप्रमाणे जीममध्ये व्यायाम केला; पाणी प्यायलं अन् अचानक कोसळला, क्षणार्धात तरूणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pune News: रोज व्यायाम करून स्वतःला फिट आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिममध्ये व्यायाम करतानाच एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना मिलिंद कुलकर्णी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.  व्यायाम करत असताना त्यांना अचानकपणे भोवळ आली आणि ते जागेवर कोसळले. त्यांना तातडीने जवळ असलेल्या मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्याने मिलिंद कुलकर्णी यांचं निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. रोज व्यायाम करून स्वतःला फिट आणि व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका 37 वर्षीय तरुणाचा जीममध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

नेमकं काय घडलं?

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावातील एका  नायट्रो जिममध्ये जात होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायलं. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. यावेळी जीममध्ये असलेल्यांनी या प्रकारानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मृत मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे.तज्ज्ञांच्या मतानुसार, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी पूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. योग्य काळजी आणि तपासणी करूनच कोणताही  व्यायामाला सुरूवात करणे गरजेचे आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
Moshi Building Collapse: आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप
आत अडकलेली माणसं 'आई-आई' ओरडताय अन् पालिका आयुक्त फुगड्या खेळतायत; मोशी इमारत दुर्घटनेतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा संताप

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget